गुटखा विक्रीप्रकरणी संशयिताला अटकपूर्व जामीन मंजूर

*कोंकण एक्सप्रेस
*गुटखा विक्रीप्रकरणी संशयिताला अटकपूर्व जामीन मंजूर
*आरोपीतर्फे अॅड. अग्निवेश तावडे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला
*कणकवली : प्रतिनिधी
प्रतिबंधित अन्नपदार्थांचा (गुटखा) साठा आढळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या सतीश उर्फ शक्ती अय्यर तेवर (४९) याला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश १ एस. टी. त्रिपाठी यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आरोपीतर्फे अॅड. अग्निवेश तावडे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.
अन्न सुरक्षा अधिकारी तेजश्री ताजणे यांनी १ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी जानवली पुलानजीक केतन राजेंद्र देऊलकर (२८, रा. तरंदळे कुंदेवाडी) याच्या पान टपरीत छापा टाकून गुटखा जप्त केला होता. हा गुटखा त्याने सतीश उर्फ शक्ती तेवर (रा. वरवडे) याच्याकडून घेतल्याचे सांगितले होते.
श्रीमती ताजणे यांच्या फिर्यादीनुसार कणकवली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील कलमांनुसार गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीप्रकरणी केतन देऊलकर व शक्ती तेवर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी केतन देऊलकर याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र शक्ती तेवर हा पसार होता. त्याच्यावतीने अॅड. अग्निवेश तावडे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. ॲड. अग्निवेश तावडे यांच्या युक्तिवादानंतर निर्णय देताना न्यायाधीश त्रिपाठी यांनी अटी व शर्थीसह शक्ती तेवर याला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
जाहिरातकणकवली मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी आम्ही काम करतो - राजस रेगे
ब्रेकिंगगणित संबोध परीक्षेत विद्यामंदिर कणकवली चे सुयश
ब्रेकिंगगांधीजींच्या विचारांना मूर्त स्वरूप आप्पासाहेबांनी दिले - सुहास ठाकूर देसाई
ब्रेकिंग