भाजप बूथ अध्यक्ष आनंद शिंदे यांचे निधन-पालकमंत्री नितेश राणे यांनी शिंदे कुटुंबीयांची भेट घेत केले सांत्वन
📅 ३ नोव्हेंबर, २०२६👁 १६ब्रेकिंग

*कोंकण एक्सप्रेस
*भाजप बूथ अध्यक्ष आनंद शिंदे यांचे निधन
*पालकमंत्री नितेश राणे यांनी शिंदे कुटुंबीयांची भेट घेत केले सांत्वन
*कणकवली : प्रतिनिधी
तालुक्यातील बोर्डवे येथील खुटवळवाडीचे भारतीय जनता पार्टीचे बूथ अध्यक्ष आनंद शिंदे (वय ५७) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी शिंदे कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिंदे कुटुंबीयांचे सांत्वन केले.
आनंद शिंदे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा आणि भाऊ असा परिवार आहे.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, बोर्डवे सरपंच वेदांगी पाताडे, माजी सरपंच गजानन शिंदे, राजेंद्र मोडक, माजी उपसरपंच महावीर साळवी, प्रदीप पालव आदी उपस्थित होते.
शेअर करा · Share
जाहिरातकणकवली मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगस्थानिक बाजारपेठेला ताकद देणारा दिवाळी बाजार जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना देईल-पालकमंत्री नितेश राणे
3 तासांपूर्वी
ब्रेकिंग*घुसखोरीला थारा नको; लोकशाहीला धोका नको!
3 तासांपूर्वी
ब्रेकिंग४९ वी नाथ पै एकांकिका स्पर्धा २४ डिसेंबरपासून कणकवलीत रंगणार!
3 तासांपूर्वी
ब्रेकिंगजानेवारीत सिंपन चषक २०२७ क्रिकेट स्पर्धा
1 दिवसांपूर्वी
