गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• बंद झालेली महालॅबची प्रयोगशाळा व रक्तनमुना संकलन सेवा तात्काळ पूर्ववत करा• नागपूरमध्ये ‘युवा शंखनाद’च्या माध्यमातून तरुणांचा हुंकार• ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी आम्ही काम करतो - राजस रेगे• गुटखा विक्रीप्रकरणी संशयिताला अटकपूर्व जामीन मंजूर• सिंधुदुर्ग – नवी मुंबई विमानसेवेचे बुकिंग सुरू!• माणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंडपाचा लोकार्पण सोहळा• खून करून अपघाताचा बनाव केल्याप्रकरणी प्रमुख आरोपीला जामीन मंजूर• मा. खास. विनायक राऊत साहेब यांनी पाझर तलाव उपोषणास दिली भेट• तलावांतील गाळ काढण्याची विशेष मोहीम राबविण्याचे नियोजन• सिंधुदुर्गच्या जलपर्यटनाला नवी दिशा; तारकर्ली ते कोरजाई रो-रो बोट सेवेला गती!• बंद झालेली महालॅबची प्रयोगशाळा व रक्तनमुना संकलन सेवा तात्काळ पूर्ववत करा• नागपूरमध्ये ‘युवा शंखनाद’च्या माध्यमातून तरुणांचा हुंकार• ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी आम्ही काम करतो - राजस रेगे• गुटखा विक्रीप्रकरणी संशयिताला अटकपूर्व जामीन मंजूर• सिंधुदुर्ग – नवी मुंबई विमानसेवेचे बुकिंग सुरू!• माणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंडपाचा लोकार्पण सोहळा• खून करून अपघाताचा बनाव केल्याप्रकरणी प्रमुख आरोपीला जामीन मंजूर• मा. खास. विनायक राऊत साहेब यांनी पाझर तलाव उपोषणास दिली भेट• तलावांतील गाळ काढण्याची विशेष मोहीम राबविण्याचे नियोजन• सिंधुदुर्गच्या जलपर्यटनाला नवी दिशा; तारकर्ली ते कोरजाई रो-रो बोट सेवेला गती!

खून करून अपघाताचा बनाव केल्याप्रकरणी प्रमुख आरोपीला जामीन मंजूर

📅 ५ नोव्हेंबर, २०२६👁 १४ब्रेकिंग
खून करून अपघाताचा बनाव केल्याप्रकरणी प्रमुख आरोपीला जामीन मंजूर

*कोंकण एक्स्पेस

*खून करून अपघाताचा बनाव केल्याप्रकरणी प्रमुख आरोपीला जामीन मंजूर

*आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले

*कणकवली : प्रतिनिधी

आर्थिक देवाणघेवाणीतून बारामती येथील अश्पाक उर्फ निहाल मुलाणी (मुळ मारशिरस, सोलापूर) याचा खून करून अपघात झाल्याचा बनाव केला. तसेच मृतदेह फोंडाघाट येथील दरीत टाकल्याप्रकरणी प्रमुख संशयित कामोठे नवीमुंबई येथील मनोज नारायण भडंगे याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश डॉ. सुधीर देशपांडे यांनी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर केला. आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.

दि. २८ डिसेंबर २०२१ रोजी फोंडाघाट दाजिपूर खिंड येथील वळणावर पल्सर मोटारसायकल संरक्षण भिंतीला आदळलेली आढळून आली होती. यावेळी दरीत पडून एक इसम म्हणजे अश्पाक मुलानी हा मयत झाला होता. त्याबाबत कणकवली पोलिसांनी तपास करून निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा गुन्हा मयतावर दाखल केला होता. त्यानंतर १० जून २०२६ रोजी मुंबई क्राईम ब्रैंच युनीट ७ यांनी दिलेल्या माहितीवरून मनोज भडंगे, सुरेंद्र सोनवडेकर, अतिष मोरे, ऋतुराज शेट्टी यांनी दोन सहकाऱ्यांसोबत पैशाच्या देवाणघेवाणीच्या वादातून कुडाळ येथील लॉजवर मयत अश्पाकला दांड्याने व लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यात तो मयत झाल्याने पुरावा नष्ट करण्यासाठी फोंडाघाटमध्ये आरोपीनी मध्यरात्रीच अपघाताचा बनाव रचला, अशी माहिती दिली होती.

त्यानुसार पुन्हा तपास करून आरोपींना अटक करण्यात आली होती. तपासात अनेक धागेदोरे निष्पन्न झाले व आरोपींविरूद्ध दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले. यात प्रमुख आरोपी मनोज भडांगे याच्यावतीने जामिनासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर ५० हजार रुपयांचा जामिन मंजूर करताना आरोपीने मोबाईल नंबर व रहिवासाच्या ठिकाणाचा पत्ता द्यावा, महाराष्ट्र सोडून जाऊ नये, मयताच्या नातेवाईकांशी संपर्क साधू नये, पासपोर्ट जमा करावे आदी अटी घालण्यात आल्या आहेत.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या

अधिक पहा →