सिंधुदुर्गच्या जलपर्यटनाला नवी दिशा; तारकर्ली ते कोरजाई रो-रो बोट सेवेला गती!

*कोंकण एक्सप्रेस
*सिंधुदुर्गच्या जलपर्यटनाला नवी दिशा; तारकर्ली ते कोरजाई रो-रो बोट सेवेला गती!
*सिंधुदुर्गच्या जलपर्यटनात क्रांती घडवणाऱ्या तारकर्ली ते कोरजाई रो-रो बोट सेवेसाठी आता महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
*सिंधुदुर्गनगरी
या सेवेसाठी तारकर्ली येथील अस्तित्वातील जेटीचे मजबुतीकरण व आधुनिकीकरण करण्यात येणार असून त्यासाठी तब्बल ४ कोटी ९७ लाख १९ हजार ८४० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जलपर्यटनात क्रांती घडविण्यासाठी पालकमंत्री तथा बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी तारकर्ली ते कोरजाई दरम्यान रो-रो बोट सेवा सुरू करण्याची महत्त्वाकांक्षी घोषणा केली होती.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी कुडाळ-मालवणचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय श्री. निलेशजी नारायणराव राणे साहेब यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून तारकर्ली जेटीच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
निश्चितच या सेवेमुळे सिंधुदुर्गच्या पर्यटनाला नवी गती मिळणार असून स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.
जाहिरातसिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगनैसर्गिक आपत्तीग्रस्त मच्छीमारांना केंद्र सरकारचा दिलासा!
ब्रेकिंगमाजी सैनिकाच्या पाल्याला परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी
ब्रेकिंगसिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ नोव्हेंबर ऐवजी ९ नोव्हेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर
ब्रेकिंग