गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• बंद झालेली महालॅबची प्रयोगशाळा व रक्तनमुना संकलन सेवा तात्काळ पूर्ववत करा• नागपूरमध्ये ‘युवा शंखनाद’च्या माध्यमातून तरुणांचा हुंकार• ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी आम्ही काम करतो - राजस रेगे• गुटखा विक्रीप्रकरणी संशयिताला अटकपूर्व जामीन मंजूर• सिंधुदुर्ग – नवी मुंबई विमानसेवेचे बुकिंग सुरू!• माणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंडपाचा लोकार्पण सोहळा• खून करून अपघाताचा बनाव केल्याप्रकरणी प्रमुख आरोपीला जामीन मंजूर• मा. खास. विनायक राऊत साहेब यांनी पाझर तलाव उपोषणास दिली भेट• तलावांतील गाळ काढण्याची विशेष मोहीम राबविण्याचे नियोजन• सिंधुदुर्गच्या जलपर्यटनाला नवी दिशा; तारकर्ली ते कोरजाई रो-रो बोट सेवेला गती!• बंद झालेली महालॅबची प्रयोगशाळा व रक्तनमुना संकलन सेवा तात्काळ पूर्ववत करा• नागपूरमध्ये ‘युवा शंखनाद’च्या माध्यमातून तरुणांचा हुंकार• ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी आम्ही काम करतो - राजस रेगे• गुटखा विक्रीप्रकरणी संशयिताला अटकपूर्व जामीन मंजूर• सिंधुदुर्ग – नवी मुंबई विमानसेवेचे बुकिंग सुरू!• माणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंडपाचा लोकार्पण सोहळा• खून करून अपघाताचा बनाव केल्याप्रकरणी प्रमुख आरोपीला जामीन मंजूर• मा. खास. विनायक राऊत साहेब यांनी पाझर तलाव उपोषणास दिली भेट• तलावांतील गाळ काढण्याची विशेष मोहीम राबविण्याचे नियोजन• सिंधुदुर्गच्या जलपर्यटनाला नवी दिशा; तारकर्ली ते कोरजाई रो-रो बोट सेवेला गती!

सिंधुदुर्ग – नवी मुंबई विमानसेवेचे बुकिंग सुरू!

📅 ५ नोव्हेंबर, २०२६👁 १०ब्रेकिंग
सिंधुदुर्ग – नवी मुंबई विमानसेवेचे बुकिंग सुरू!

*कोंकण एक्सप्रेस

*सिंधुदुर्ग – नवी मुंबई विमानसेवेचे बुकिंग सुरू!

*१६ नोव्हेंबरला पहिल्या विमानाचे उड्डाण; कोकणवासीयांसाठी आता दररोज विमानसेवा!

*पालकमंत्री नितेश राणे यांची 'येवा, कोकण आपलोच आसा!' म्हणत प्रवासी व पर्यटकांना साद

*सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग (चिपी) ते नवी मुंबई विमानसेवेच्या तिकिटांचे बुकिंग सुरू झाले असून, येत्या १६ नोव्हेंबर २०२६ रोजी या मार्गावरील fly91 विमानाचे उड्डाण होणार आहे. विशेष म्हणजे, आता आठवड्यातील सातही दिवस ही विमानसेवा उपलब्ध होणार असल्याने कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या 'X' या सोशल मीडिया माध्यमावर पोस्ट करत ही माहिती दिली. 'येवा, कोकण आपलोच आसा!' असे म्हणत त्यांनी प्रवासी आणि पर्यटकांना या विमानसेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

या विमानसेवेमुळे सिंधुदुर्ग आणि नवी मुंबईदरम्यानचा प्रवास अधिक सुलभ आणि जलद होणार आहे. कोकणवासीय, पर्यटक, व्यावसायिक तसेच मुंबई आणि नवी मुंबईशी नियमित संपर्क ठेवणाऱ्या नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासोबतच जिल्ह्याची मुंबई महानगर प्रदेशाशी हवाई कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण घडामोड ठरणार आहे.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या

अधिक पहा →