बुधवार, ४ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• तलावांतील गाळ काढण्याची विशेष मोहीम राबविण्याचे नियोजन• सिंधुदुर्गच्या जलपर्यटनाला नवी दिशा; तारकर्ली ते कोरजाई रो-रो बोट सेवेला गती!• गणित संबोध परीक्षेत विद्यामंदिर कणकवली चे सुयश• एमआयडीसीमध्ये राणेंच्या कंपन्यांनी घेतलेल्या जागांवर आधी उद्योग सुरू करा, मगच २१ व्या शतकातील कुडाळ एमआयडीसी साकारण्याच्या बाता मारा• गांधीजींच्या विचारांना मूर्त स्वरूप आप्पासाहेबांनी दिले - सुहास ठाकूर देसाई• चिपळूण येथे सामाजिक कार्यकर्ते अनुराग उतेकर यांच्यासह शेकडो युवक-युवती व ग्रामस्थांचा भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश• भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी मागणी• अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, गोततर्फे सावंतवाडीत उद्या भव्य मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर• चिपळुणात भाजपची ‘राष्ट्रचिंतन बैठक’• नैसर्गिक आपत्तीग्रस्त मच्छीमारांना केंद्र सरकारचा दिलासा!• तलावांतील गाळ काढण्याची विशेष मोहीम राबविण्याचे नियोजन• सिंधुदुर्गच्या जलपर्यटनाला नवी दिशा; तारकर्ली ते कोरजाई रो-रो बोट सेवेला गती!• गणित संबोध परीक्षेत विद्यामंदिर कणकवली चे सुयश• एमआयडीसीमध्ये राणेंच्या कंपन्यांनी घेतलेल्या जागांवर आधी उद्योग सुरू करा, मगच २१ व्या शतकातील कुडाळ एमआयडीसी साकारण्याच्या बाता मारा• गांधीजींच्या विचारांना मूर्त स्वरूप आप्पासाहेबांनी दिले - सुहास ठाकूर देसाई• चिपळूण येथे सामाजिक कार्यकर्ते अनुराग उतेकर यांच्यासह शेकडो युवक-युवती व ग्रामस्थांचा भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश• भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी मागणी• अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, गोततर्फे सावंतवाडीत उद्या भव्य मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर• चिपळुणात भाजपची ‘राष्ट्रचिंतन बैठक’• नैसर्गिक आपत्तीग्रस्त मच्छीमारांना केंद्र सरकारचा दिलासा!

गांधीजींच्या विचारांना मूर्त स्वरूप आप्पासाहेबांनी दिले - सुहास ठाकूर देसाई

📅 ४ नोव्हेंबर, २०२६👁 ७ब्रेकिंग
गांधीजींच्या विचारांना मूर्त स्वरूप आप्पासाहेबांनी दिले - सुहास ठाकूर देसाई

*कोंकण एक्सप्रेस

*गांधीजींच्या विचारांना मूर्त स्वरूप आप्पासाहेबांनी दिले - सुहास ठाकूर देसाई

*कणकवली : प्रतिनिधि

शाश्वत जीवनशैली खेड्यापाड्यात असते म्हणून खेड्यात चला असा मंत्र महात्मा गांधींनी दिला आणि त्याचे मूर्त स्वरूप अप्पासाहेब पटवर्धन यांनी निर्माण केलेल्या गोपुरी आश्रमाच्या रूपाने जगासमोर आले.

आज आपल्या देशाची जीवनशैली फारच विचित्र बनली आहे, अशावेळी अप्पासाहेबांच्या गोपुरी आश्रमाच्या संकल्पनेचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक असून आज अप्पासाहेब पटवर्धन यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त येथे उपस्थित झालेल्या प्रत्येक अप्पाप्रेमी कार्यकर्त्यांने प्रयत्न करावा असे आवाहन सुहास ठाकूर देसाई यांनी केले. सुहास ठाकूर देसाई यांनी आप्पासाहेबांच्या सानिध्यात गोपुरी आश्रमात बालपण व्यतीत केलेले आहे. त्यावेळच्या आठवणी देखील त्यांनी यावेळी सांगितल्या.

कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांची 132 वी जयंती गोपुरी आश्रमात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमात आप्पा साहेबांच्या विचारांचा स्वतः अंगीकार करून पुढील जयंती दिना पर्यंत आप्पासाहेबांच्या विचारांचे दोन सहकारी तयार करण्याची शपथ यावेळी जेष्ठ पत्रकार अशोक काका करंबेळकर यांनी सर्वांना दिली . या जयंती कार्यक्रमात मोहन सावंत सर यांनी देखील आपले विचार मांडले. तर सुरेश रासम यांनी आप्पा साहेबांच्या जीवन कार्याविषयी माहिती उपस्थितांना दिली.

या कार्यक्रमात एस डी गोवेकर , पत्रकार विजय गांवकर, भगवान लोके , बाळू मेस्त्री, व्ही के सावंत, विनायक सापळे , सुनील सावंत,गोपुरी आश्रमाचे कर्मचारी तसेच इतर आप्पासाहेब प्रेमी उपस्थित होते.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →