गणित संबोध परीक्षेत विद्यामंदिर कणकवली चे सुयश

*कोंकण एक्सप्रेस
*गणित संबोध परीक्षेत विद्यामंदिर कणकवली चे सुयश
*कणकवली : प्रतिनिधि
राज्य गणित अध्यापक मंडळ सलग्न गणित अध्यापक मंडळ सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवलीच्या विद्यार्थ्यांनी गणित संबोध परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून मानाचा तुरा रोवला आहे .
यशस्वी विद्यार्थी (इयत्ता पाचवी) :- कार्तिकी नंदकुमार खवरे 98, वेद निलेश कडूलकर 96, पराग सचिन लिमये 96, स्वरीत महेश पिळणकर 92, राजदीप संतोष शिंदे 92, प्राची संजय गवस 88, हास्य रवींद्र फाळके 88, श्रीया स्वप्निल सावंत 84, इयत्ता आठवी:- सानवी सुरेश जाधव 98, समर्थ मंजुनाथ कुंभार 92, आर्या गुरुनाथ वालावलकर 94, संदेश दिलीप गावडे 88, ओम आनंद हळवे 88, नमिश आनंद चिंदरकर ८६, सर्वेश संतोष गलोले 82, परिणीता अनिल ठाकूर ८२, साना शशिकांत कांबळे 82.
वरील यशस्वी विद्यार्थी पुढील होणाऱ्या गणित प्राविण्य परीक्षेस पात्र झाले आहेत. गणिताचा पाया पक्का होण्यासाठी व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी या परीक्षा खूप महत्त्वपूर्ण असतात. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे गणित शिक्षक संदीप नागभिडकर, सूर्यकांत खरात, नेताजी जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शि.प्र. मं. कणकवलीचे चेअरमन डॉ. अनंत नागवेकर, सचिव श्री विजयकुमार वळंजू , विश्वस्त श्री अनिलपंत डेगवेकर तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. पी.जे. कांबळे, पर्यवेक्षक अच्युतराव वणवे व सर्व शिक्षकवृंदांनी अभिनंदन केले.
जाहिरातकणकवली मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगगांधीजींच्या विचारांना मूर्त स्वरूप आप्पासाहेबांनी दिले - सुहास ठाकूर देसाई
ब्रेकिंगभाजप बूथ अध्यक्ष आनंद शिंदे यांचे निधन-पालकमंत्री नितेश राणे यांनी शिंदे कुटुंबीयांची भेट घेत केले सांत्वन
ब्रेकिंगस्थानिक बाजारपेठेला ताकद देणारा दिवाळी बाजार जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना देईल-पालकमंत्री नितेश राणे
ब्रेकिंग