शिरवली येथील संदीप जामदार यांचे निधन
📅 २१ ऑक्टोबर, २०२६👁 १४

*कोंकण एक्सप्रेस
*शिरवली येथील संदीप जामदार यांचे निधन
*शिरगांव : संतोष साळसकर
देवगड तालुक्यातील शिरवली- जामदारवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक संदीप गंगाराम जामदार (53 वर्षे ) यांचे सोमवार दि. 19 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वा. अल्पशा आजाराने मुंबई येथे उपचारादरम्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ, भावजय असा परिवार आहे. देवगड तालुक्यातील चाफेड गावचे माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रवीण राणे यांचे ते साडू होत. संदीप जामदार हे अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यामुळे त्यांचा मित्र परिवार मोठा होता. ते मुंबई- गिरगांव येथील विल्सन हायस्कुल मध्ये क्लार्क या पदावर कामाला होते.
शेअर करा · Share
जाहिरात



