रविवार, १८ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेचे वर्चस्व• कोमसापच्या कणकवली शाखा अध्यक्षपदी गणेश जेठे• कणकवली शहरातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरसेवकांनी मानले पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार• शिरवल खासकीलवाडीतील रस्त्याची दुरवस्था• शिरवल खासकिलवाडीत संदीप चौकेकर मित्रमंडळाचा महिलांसाठी आरोग्य व स्वच्छता अभियानाचा उपक्रम!• सिंधुदुर्गातील जलसंधारणाच्या शाश्वत उपाययोजनाना मिळणार• सासोली येथे नूतन तलाठी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण• वनरक्षक महिलेच्या आत्महत्याप्रकरणी आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर• ज्ञानेश कुमारांचा राजीनामा न झाल्यास वैभववाडीत आंदोलन छेडणार• वापरत नसलेला चारा कापणी व वाहतुकीचे नियोजन करण्याचे निर्देश-पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांच्या सूचना• मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेचे वर्चस्व• कोमसापच्या कणकवली शाखा अध्यक्षपदी गणेश जेठे• कणकवली शहरातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरसेवकांनी मानले पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार• शिरवल खासकीलवाडीतील रस्त्याची दुरवस्था• शिरवल खासकिलवाडीत संदीप चौकेकर मित्रमंडळाचा महिलांसाठी आरोग्य व स्वच्छता अभियानाचा उपक्रम!• सिंधुदुर्गातील जलसंधारणाच्या शाश्वत उपाययोजनाना मिळणार• सासोली येथे नूतन तलाठी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण• वनरक्षक महिलेच्या आत्महत्याप्रकरणी आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर• ज्ञानेश कुमारांचा राजीनामा न झाल्यास वैभववाडीत आंदोलन छेडणार• वापरत नसलेला चारा कापणी व वाहतुकीचे नियोजन करण्याचे निर्देश-पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांच्या सूचना

मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेचे वर्चस्व

📅 १८ ऑक्टोबर, २०२६👁 २ब्रेकिंग
मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेचे वर्चस्व

*कोंकण एक्सप्रेस

*मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेचे वर्चस्व

*तब्बल १६मुलांचीजिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड

*शिरवंडे, ता. मालवण : प्रतिनिधि

त्रिमूर्ती विकास मंडळ, मुंबई संचालित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, शिरवंडे येथे झालेल्या मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यजमान शाळेच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. विविध मैदानी क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

धावणे व हर्डल्स : भाविक महेंद्र गावकर याने धावण्याच्या स्पर्धेत प्रथम, तर हर्डल्समध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. वारू गणेश गावकर व मानस संजय गावकर यांनी हर्डल्समध्ये प्रथम क्रमांक पटकावला. किरण शेळके याने ८०० मीटर धावणे व हॅमर स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. सावली गोविंद घाडीगावकर हिने १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. चेतना नारायण घाडीगावकर हिने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक व लांब उडी प्रथम,तर करिश्मा संतोष शेळके हिने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. धनिष्ठा सुनील घाडीगावकर हिने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला.

५ किलोमीटर चालणे : लक्षदीप अमोल गावकर याने ५ किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत द्वितीय, तर विराज कमलाकर गावकर याने प्रथम क्रमांक मिळवला.

हॅमर थ्रो : नाचिकेत लक्ष्मण घाडीगावकर याने प्रथम, तर किरण शेळके याने द्वितीय क्रमांक मिळवला. शमिका गणेश शेळके हिनेही हॅमर थ्रोमध्ये प्रथम क्रमांक व३०००धावणे प्रथम पटकावला.

गोळाफेक व थाळीफेक : वेदिका रवींद्र गावकर हिने गोळा प्रथम क्रमांक व लांब उडी तृतीय क्रमांक सानिका दिपक गांवकर थाळी फेक प्रथम आणि गोळा फेक द्वितीय क्रमांक,श्रेयश चव्हाण लांब उडी तृतीय आणि रिले द्वितीय क्रमांक.अशा प्रकारे विविध स्पर्धांमध्ये उज्ज्वल यश संपादित केले आहे.तब्बल १६ स्पर्धकांची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे.सर्व‌ यशस्वी स्पर्धक आणि क्रीडा शिक्षक श्री सुभाष सावंत यांचे सर्व पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य शालेय समिती शाळा व्यवस्थापन समिती विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती सखी सावित्री समिती, मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी माजी विद्यार्थी संघ, विद्यार्थी पालक ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आणि जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

मालवण मधील अधिक बातम्या

अधिक पहा →