चाफेड गावठण प्रशालेत शारदोत्सव कार्यक्रम संपन्न

*कोंकण एक्सप्रेस
*चाफेड गावठण प्रशालेत शारदोत्सव कार्यक्रम संपन्न
*शिरगांव : संतोष साळसकर
देवगड तालुक्यातील चाफेड गावठण येथील प्राथमिक शाळेत सरस्वती पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी दिवसभरात विविध कार्यक्रम पार पडले.
सकाळी सरस्वती मातेचे वाजत गाजत मिरवणूक काढून त्यानंतर पूजन झाल्यानंतर विविध मान्यवरांनी शाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी गावचे सरपंच साहिल पांचाळ त्यांच्या पत्नी सौ श्रद्धा पांचाळ, उपसरपंच महेश राणे, पोलीस पाटील संतोष सावंत, महेश घाडी, शिक्षक संजय घोटणकर प्रकाश पवार, प्रशालेचे मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वासुदेव गावकर, उपाध्यक्ष उदय राणे, माजी सरपंच आकाश राणे, पोलीस पाटील संतोष सावंत, माजी तंटामुक्त अध्यक्ष प्रवीण राणे माजी सरपंच संतोष साळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुलांनी भजने आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसेच गावातील भजनी मंडळानी आपली भजनी कला सादर केली.
जाहिरातदेवगड मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
चाफेड येथील प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक लवू राणे यांचे निधन

वर्दी नसूनही मिळतोय समाजात मानाचा सलाम
ब्रेकिंगपालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन
ब्रेकिंग