मंगळवार, २० ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• कणकवलीत ३ नोव्हेंबरपासून भाजपच्या वतीने 'दिवाळी बाजारा'चे आयोजन• मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेचे वर्चस्व• कोमसापच्या कणकवली शाखा अध्यक्षपदी गणेश जेठे• कणकवली शहरातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरसेवकांनी मानले पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार• शिरवल खासकीलवाडीतील रस्त्याची दुरवस्था• शिरवल खासकिलवाडीत संदीप चौकेकर मित्रमंडळाचा महिलांसाठी आरोग्य व स्वच्छता अभियानाचा उपक्रम!• सिंधुदुर्गातील जलसंधारणाच्या शाश्वत उपाययोजनाना मिळणार• सासोली येथे नूतन तलाठी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण• वनरक्षक महिलेच्या आत्महत्याप्रकरणी आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर• ज्ञानेश कुमारांचा राजीनामा न झाल्यास वैभववाडीत आंदोलन छेडणार• कणकवलीत ३ नोव्हेंबरपासून भाजपच्या वतीने 'दिवाळी बाजारा'चे आयोजन• मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेचे वर्चस्व• कोमसापच्या कणकवली शाखा अध्यक्षपदी गणेश जेठे• कणकवली शहरातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरसेवकांनी मानले पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार• शिरवल खासकीलवाडीतील रस्त्याची दुरवस्था• शिरवल खासकिलवाडीत संदीप चौकेकर मित्रमंडळाचा महिलांसाठी आरोग्य व स्वच्छता अभियानाचा उपक्रम!• सिंधुदुर्गातील जलसंधारणाच्या शाश्वत उपाययोजनाना मिळणार• सासोली येथे नूतन तलाठी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण• वनरक्षक महिलेच्या आत्महत्याप्रकरणी आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर• ज्ञानेश कुमारांचा राजीनामा न झाल्यास वैभववाडीत आंदोलन छेडणार

शिरवलमध्ये संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या नवदुर्गा मातेचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

📅 २० ऑक्टोबर, २०२६👁 ३
शिरवलमध्ये संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या नवदुर्गा मातेचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

*कोंकण एक्सप्रेस

*शिरवलमध्ये संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या नवदुर्गा मातेचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन!

*‘संदीप चौकेकर यांच्यासारखे सामाजिक भान जपणारे कार्यकर्ते प्रत्येक गावात निर्माण व्हावेत

*ग्रामीण भागाच्या विकासासाठी त्यांच्या कार्याचे संदेश पारकर यांच्याकडून कौतुक

*कणकवली : प्रतिनिधि

ऑक्टोबर (प्रतिनिधी)कणकवली तालुक्यातील शिरवल येथे संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी नवदुर्गा मातेचे दर्शन घेतले. यावेळी मित्रमंडळाचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांच्या हस्ते भगवी शाल पांघरून, शाल व श्रीफळ देऊन नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा सत्कार करण्यात आला. या भेटीदरम्यान संदेश पारकर यांनी संदीप चौकेकर यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत ग्रामीण भागाच्या विकासासाठी समाजाभिमुख कार्यकर्त्यांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.

शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देवीच्या दर्शनासाठी शिरवल येथे आल्याचा आनंद व्यक्त करत संदेश पारकर म्हणाले की, संदीप चौकेकर यांच्या माध्यमातून कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागात सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. काही महिन्यांपूर्वी गावात आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेलाही मोठा प्रतिसाद मिळाला होता. ग्रामीण भागातील तरुणांना संधी उपलब्ध करून देणे, गावात सामाजिक आणि क्रीडाविषयक वातावरण निर्माण करणे, हे त्यांच्या कार्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीच्या उपासनेतून प्रगतीचा संदेश

नवरात्रोत्सवाचे महत्त्व विशद करताना संदेश पारकर यांनी देवीच्या महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या रूपांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, महाकालीचे रूप समाजातील दुर्गुणांचा नाश करण्याची प्रेरणा देते. महालक्ष्मीचे आशीर्वाद जीवनात वैभव आणि समृद्धी निर्माण करतात, तर महासरस्वतीची उपासना ज्ञान आणि प्रगतीचा मार्ग दाखवते. देवीची पूजा-अर्चा करतानाच समाजाची, गावाची आणि तालुक्याची प्रगती साधण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत.

‘संदीप चौकेकर यांच्यासारखे कार्यकर्ते प्रत्येक गावात निर्माण व्हावेत’

संदीप चौकेकर यांच्या कार्याचे कौतुक करताना संदेश पारकर म्हणाले की, प्रत्येक गावात संदीप चौकेकर यांच्यासारखे सामाजिक जाणीव असलेले कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजेत. गावातील प्रश्न समजून घेऊन, नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन आणि त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन गावाच्या विकासासाठी काम करणारे नेतृत्व समाजाला आवश्यक आहे. मोठ्या शहरांमध्ये ज्या सुविधा आणि विकासकामे होतात, त्याच धर्तीवर ग्रामीण भागातील गावांचाही सर्वांगीण विकास झाला पाहिजे.

“सत्ता असो वा नसो, पद असो वा नसो; समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन काम करणे महत्त्वाचे आहे,” असे सांगत त्यांनी संदीप चौकेकर यांच्या सामाजिक बांधिलकीचे विशेष कौतुक केले.

संदीप चौकेकर हे स्वतःच्या परीने आणि स्वतःच्या अधिकारात शक्य होईल तेवढे काम गावासाठी करत आहेत. त्यांच्या कार्यामागे कोणताही वैयक्तिक स्वार्थ नसून जनतेचा आशीर्वाद मिळवण्याची भावना आहे. त्यामुळे शिरवलवासीयांसह कणकवली तालुक्यातील नागरिकांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे आवाहनही पारकर यांनी केले.

तरुणांच्या रोजगारासाठी आणि गावाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन

संदीप चौकेकर यांना मार्गदर्शन करताना संदेश पारकर म्हणाले की, गावाच्या विकासासाठीची तळमळ आणि कल्पकता कायम ठेवावी. गावातील तरुणांच्या हाताला रोजगार कसा मिळेल, गावातील प्रश्न कसे सुटतील आणि विकासकामांना कशी गती मिळेल, यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहावे. त्यांच्या कार्याची दखल जनतेने घेतली असून, त्यांच्या नेतृत्वावर आणि कर्तृत्वावर जनतेचा विश्वास आहे.

यश-अपयश आणि संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग असतो. मात्र, संघर्षातून घडणारे नेतृत्व आपल्या कामातून जनतेच्या मनात स्थान निर्माण करते. त्यामुळे टीका किंवा अडचणींची चिंता न करता जनसेवा सुरू ठेवावी. जनतेचा आशीर्वाद आणि देवीची कृपा निश्चितच पाठीशी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपण स्वतःही जनतेच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे समाजात स्थान निर्माण करू शकलो, असे सांगत संदेश पारकर यांनी संदीप चौकेकर यांना भविष्यातील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. शिरवलवासीयांना निरोगी आरोग्य, सुख, शांती, समृद्धी आणि भरभराट लाभावी, तसेच संदीप चौकेकर यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, अशी प्रार्थनाही त्यांनी देवीच्या चरणी केली.

संदीप चौकेकर यांनीही व्यक्त केल्या शुभेच्छा

यावेळी संदीप चौकेकर यांनी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे स्वागत व सत्कार केला. संदेश पारकर यांच्या मनातील इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत आणि त्यांना निरोगी आरोग्य लाभो, अशी प्रार्थना दुर्गामातेकडे केल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी संदीप चौकेकर मित्रमंडळाचे अध्यक्ष संदीप चौकेकर, शिरवल ग्रामपंचायत उपसरपंच प्रवीण तांबे, सामाजिक कार्यकर्ते निखित मूरकर, पत्रकार तुळशीदार कुडतरकर, सुनील कुडतडकर, कृष्णा यादव ,यांच्यासह संदीप चौकेकर मित्रमंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →