चाफेड येथील प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक लवू राणे यांचे निधन

*कोंकण एक्सप्रेस
*चाफेड येथील प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक लवू राणे यांचे निधन
*शिरगांव : संतोष साळसकर
देवगड तालुक्यातील चाफेड - गावठण राणेवाडी येथील प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक लवू बाबाजी राणे ( 89 वर्षे ) यांचे शुक्र. दि. 16 ऑक्टोबर रोजी पहाटे 4.45 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते 'लवूदादा' या नावाने सुपरिचित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक बहीण, 2 विवाहित मुलगे, सुना, 2 विवाहित मुली, जावई, नातवंडे, नातजावई असा मोठा परिवार आहे. त्यांना धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्राची खूप आवड होती. येथील श्री. कुलश्वामिनी मंदिराची स्थापना होण्यापासून ते आजतागायत नित्यनेमाने आणि भक्तीभावाने मंदिरात जायचे. मंदिरातील धार्मिक उत्सवात त्यांचा नेहमी सहभाग असायचा. शालेय मुलांच्या शिक्षणासाठी त्यांचे आर्थिक दृष्ट्या दा्तृत्व खूप मोठे होते. त्यांचा स्वभाव खूप मनमिळावू होता. त्यांना भजन गायनाची खूप आवड होती.
चाफेड चे उपसरपंच महेश राणे यांचे ते चुलते, प्रसिद्ध भजनी बुवा विशाल राणे यांचे आजोबा तर पत्रकार अजित सावंत यांचे ते काका होत.
जाहिरातदेवगड मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
चाफेड गावठण प्रशालेत शारदोत्सव कार्यक्रम संपन्न

वर्दी नसूनही मिळतोय समाजात मानाचा सलाम
ब्रेकिंगपालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन
ब्रेकिंग