गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदगाव येथे ‘सिंधू जनसंवाद आरोग्य यात्रे’चा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ• पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याहस्ते हेत येथे कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन• भाटकर कुटुंबीयांची आमदार प्रमोद जठार यांनी घेतली भेट• सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा स्तुत्य उपक्रम : वनराई बंधाऱ्यांसाठी २५ हजार पिशव्यांचे वितरण• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदगाव येथे ‘सिंधू जनसंवाद आरोग्य यात्रे’चा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ• पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याहस्ते हेत येथे कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन• भाटकर कुटुंबीयांची आमदार प्रमोद जठार यांनी घेतली भेट• सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा स्तुत्य उपक्रम : वनराई बंधाऱ्यांसाठी २५ हजार पिशव्यांचे वितरण• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम

वर्दी नसूनही मिळतोय समाजात मानाचा सलाम

देवा अकॅडमीच्या माध्यमातून शेकडो पोलीस, अग्नीवीर तयार

📅 १५ ऑक्टोबर, २०२६👁 ४५
वर्दी नसूनही मिळतोय समाजात मानाचा सलाम

*कोंकण एक्सप्रेस

*वर्दी नसूनही मिळतोय समाजात मानाचा सलाम

*देवा अकॅडमीच्या माध्यमातून शेकडो पोलीस, अग्नीवीर तयार

*नवनाथ राणे यांचा प्रेरणादायी प्रवास

*शिरगांव : संतोष साळसकर

घरची परिस्थिती अतिशय गरिबीची असल्यामुळे त्याने नोकरीसाठी मुंबई गाठली. पोलीस विभागात भरती होण्यासाठी कधी गुणांची तर कधी पैशांची गरज भासली मात्र इच्छा अपूर्ण राहिली. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर आजीवली गावातील नवनाथ राणे यांनी देवा अकॅडमीच्या माध्यमातून शेकडो पोलीस कर्मचारी, अधिकारी, अग्नीवीर जवान तयार करत स्वतःचे स्वप्न त्यांच्याकडून पूर्ण केले. आज स्वतःकडे वर्दी नसली तरी राणे यांना मिळणाऱ्या मानाच्या सलामामुळे ऊर अधिक भरून येत आहे.

गावात आई-वडिलांबरोबर शेती करताना आर्थिक स्त्रोत निर्माण व्हावे म्हणून नोकरीसाठी राणे यांना मुंबईकडे धाव घ्यावी लागली. बारावीपर्यंतचे शिक्षण गावातच केले. परिस्थितीमुळे पुढील शिक्षण पूर्ण करता येत नव्हते. २०१४ पासून पोलीस भरतीसाठी प्रयत्न सुरू केले. २०१५ साली ठाणे येथील अकॅडमी जॉइन करायची या हेतूने तेथे राणे हजर झाले. मात्र फी भरणे कठीण होते. २०१८ च्या भरती ते प्रतीक्षा यादीत राहिले. मात्र पोलीस भरतीचे स्वप्न पूर्ण झाले नाही. अकॅडमीच्या मालकांनी सांगितले. तुम्ही चांगले शिकवू शकता. एक मैदान घेऊन मुलांना प्रशिक्षण द्या. त्यावेळेस राणे यांनी ठरवले. आपण पोलीस अधिकारी झालो नसलो तरी इतर तरुणांना घडवून आपले स्वप्न सत्यात उतरवायचे. आणि त्यांचा प्रेरणादायी प्रवास सुरू झाला.

नवनाथ राणे यांनी दिव्यात २०१८/१९ या वर्षात देवा अकॅडमी स्थापन केली. यावेळी त्यांच्याकडे फक्त दोन मुले होती. सध्याच्या घडीला त्यांच्याकडे महाराष्ट्रातील जवळपास १५० हून अधिक तरुण-तरुणी विविध पोलीस अधिकारी, जवान होण्यासाठी प्रशिक्षण घेत आहेत. आतापर्यंत शंभरहून अधिक पोलीस अधिकारी, हवालदार तयार झाले असून प्रशासकीय सेवेत तर अग्निवीर जवान देशाच्या संरक्षणासाठी तैनात झाले. मुंबई भांडुपमध्ये प्रशिक्षणासाठी एक मैदान तर रेल्वे स्थानकानजीक एक गाळा भाड्याने घेण्यात आला असून त्यामध्ये एकाच वेळी पन्नास विद्यार्थी बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. दोन अधिव्याख्याता आणि स्वतः राणे या भरतीपूर्व प्रशिक्षण देण्याची जबाबदारी फक्त विद्यार्थ्यांकडून माफक अशा घेण्यात आलेल्या फी मधून करत आहेत.

मोफत मार्गदर्शन

राणे स्वतः सोलापूर, सांगली, सातारा यासह विविध ठिकाणी सुट्टीच्या वेळात मोफत वर्ग घेऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. ज्यांना मुंबईत येणे शक्य होत नाही. अशा होतकरू तरुण तरुणींना ऑनलाइन क्लासेसच्या माध्यमातून आवश्यक टिप्स देण्याचे काम राणे करतात. स्वतः दिव्यासारख्या ठिकाणी भाड्याच्या खोलीत राहून आपला संसाराचा गाडा सांभाळताना एखाद्या विद्यार्थ्याला गरज पडल्यास स्वतःच्या खिशातील रक्कम भरण्याची तयारी राणे यांनी आजही ठेवली.

अठराव्या वर्षी तरुणीची पोलीस भरतीत निवड

आपल्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांची भरती व्हावी यासाठी पुरेपूर मेहनत घेण्याचे काम राणे यांनी केले. यामुळेच संगमेश्वर मधील तरुणी वयाच्या १८ व्या वर्षीच पहिल्याच पोलीस भरतीत निवडली गेली. तर रत्नागिरी मधील २२ यावर्षी तरुणी पीएसआय पदापर्यंत पोहोचली असून लवकरच तिची निवड होईल असा विश्वास राणे यांना आहे.

कोट

माणूस एकदा जिद्दीला पेटला तर तो काहीही करू शकतो. अधिकारी होण्याचे माझे जरी स्वप्न पूर्ण झाले नाही तरीही प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांमधून घडलेल्या जवानांबद्दल मला अभिमान आहे. मोठ्या गर्दीतही बंदोबस्तासाठी असलेले पोलीस कॉन्स्टेबल जेव्हा सर्वांसमोर सर म्हणून हाक मारत नतमस्तक होतात. त्यावेळी मिळणारा आनंद शब्दात मांडता येत नाही एवढा असतो.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

देवगड मधील अधिक बातम्या

अधिक पहा →