मंगळवार, २० ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• कणकवलीत ३ नोव्हेंबरपासून भाजपच्या वतीने 'दिवाळी बाजारा'चे आयोजन• मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेचे वर्चस्व• कोमसापच्या कणकवली शाखा अध्यक्षपदी गणेश जेठे• कणकवली शहरातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरसेवकांनी मानले पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार• शिरवल खासकीलवाडीतील रस्त्याची दुरवस्था• शिरवल खासकिलवाडीत संदीप चौकेकर मित्रमंडळाचा महिलांसाठी आरोग्य व स्वच्छता अभियानाचा उपक्रम!• सिंधुदुर्गातील जलसंधारणाच्या शाश्वत उपाययोजनाना मिळणार• सासोली येथे नूतन तलाठी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण• वनरक्षक महिलेच्या आत्महत्याप्रकरणी आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर• ज्ञानेश कुमारांचा राजीनामा न झाल्यास वैभववाडीत आंदोलन छेडणार• कणकवलीत ३ नोव्हेंबरपासून भाजपच्या वतीने 'दिवाळी बाजारा'चे आयोजन• मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेचे वर्चस्व• कोमसापच्या कणकवली शाखा अध्यक्षपदी गणेश जेठे• कणकवली शहरातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरसेवकांनी मानले पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार• शिरवल खासकीलवाडीतील रस्त्याची दुरवस्था• शिरवल खासकिलवाडीत संदीप चौकेकर मित्रमंडळाचा महिलांसाठी आरोग्य व स्वच्छता अभियानाचा उपक्रम!• सिंधुदुर्गातील जलसंधारणाच्या शाश्वत उपाययोजनाना मिळणार• सासोली येथे नूतन तलाठी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण• वनरक्षक महिलेच्या आत्महत्याप्रकरणी आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर• ज्ञानेश कुमारांचा राजीनामा न झाल्यास वैभववाडीत आंदोलन छेडणार

विशाल परब साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित NCMC कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

📅 २० ऑक्टोबर, २०२६👁 ४#विशाल परब
विशाल परब साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित NCMC कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

*कोंकण एक्सप्रेस

*विशाल परब साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित NCMC कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

*८० नागरिकांनी घेतला लाभ

*कुंभारटेम्ब मित्र मंडळ, तुळस यांचा सामाजिक उपक्रम; नागरिकांकडून कौतुक

*तुळस -सावंतवाडी - प्रतिनिधि

मा. विशाल परब साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कुंभारटेम्ब मित्र मंडळ, तुळस यांच्या वतीने रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी श्री शारदा विद्यालय, तुळस येथे NCMC कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, तब्बल ८० नागरिकांनी NCMC कार्डचा लाभ घेतला.

नागरिकांना NCMC कार्ड काढण्यासाठी वेंगुर्ला येथे जावे लागू नये, तसेच त्यांचा वेळ वाचून स्थानिक पातळीवरच ही सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महिला, शेतकरी व इतर नागरिकांना या उपक्रमाचा लाभ घेता आला. नागरिकांची गैरसोय टाळून त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

मा. विशाल परब साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या उपयोगाचा उपक्रम राबविण्यात आल्याने या शिबिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले. कुंभारटेम्ब मित्र मंडळाने स्थानिक नागरिकांसाठी पुढाकार घेतल्याने अनेकांना एकाच ठिकाणी कार्डसंबंधी सुविधा मिळाली.

“विशाल परब साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांच्या उपयोगाचा उपक्रम राबविता आला, याचा आनंद आहे. नागरिकांना विविध शासकीय व सार्वजनिक सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी असे सामाजिक उपक्रम यापुढेही राबविण्याचा आमचा प्रयत्न राहील,” अशी भावना उपसरपंच नारायण कुंभार यांनी व्यक्त केली.

या शिबिराच्या यशस्वितेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे तसेच शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या नागरिकांचे कुंभारटेम्ब मित्र मंडळ, तुळस यांच्या वतीने आभार मानण्यात आले.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सावंतवाडी मधील अधिक बातम्या

अधिक पहा →