रविवार, १८ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेचे वर्चस्व• कोमसापच्या कणकवली शाखा अध्यक्षपदी गणेश जेठे• कणकवली शहरातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरसेवकांनी मानले पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार• शिरवल खासकीलवाडीतील रस्त्याची दुरवस्था• शिरवल खासकिलवाडीत संदीप चौकेकर मित्रमंडळाचा महिलांसाठी आरोग्य व स्वच्छता अभियानाचा उपक्रम!• सिंधुदुर्गातील जलसंधारणाच्या शाश्वत उपाययोजनाना मिळणार• सासोली येथे नूतन तलाठी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण• वनरक्षक महिलेच्या आत्महत्याप्रकरणी आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर• ज्ञानेश कुमारांचा राजीनामा न झाल्यास वैभववाडीत आंदोलन छेडणार• वापरत नसलेला चारा कापणी व वाहतुकीचे नियोजन करण्याचे निर्देश-पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांच्या सूचना• मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेचे वर्चस्व• कोमसापच्या कणकवली शाखा अध्यक्षपदी गणेश जेठे• कणकवली शहरातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरसेवकांनी मानले पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार• शिरवल खासकीलवाडीतील रस्त्याची दुरवस्था• शिरवल खासकिलवाडीत संदीप चौकेकर मित्रमंडळाचा महिलांसाठी आरोग्य व स्वच्छता अभियानाचा उपक्रम!• सिंधुदुर्गातील जलसंधारणाच्या शाश्वत उपाययोजनाना मिळणार• सासोली येथे नूतन तलाठी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण• वनरक्षक महिलेच्या आत्महत्याप्रकरणी आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर• ज्ञानेश कुमारांचा राजीनामा न झाल्यास वैभववाडीत आंदोलन छेडणार• वापरत नसलेला चारा कापणी व वाहतुकीचे नियोजन करण्याचे निर्देश-पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांच्या सूचना

कणकवली शहरातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरसेवकांनी मानले पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार

📅 १८ ऑक्टोबर, २०२६👁 १०ब्रेकिंग#नितेश राणे
कणकवली शहरातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरसेवकांनी मानले पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार

*कोंकण एक्सप्रेस

*कणकवली शहरातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरसेवकांनी मानले पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार

*कणकवली : प्रतिनिधि

शहरातील विविध विकासकामांना गती देण्यासाठी सिंधुदुर्ग चे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आहे. शहरातील उद्यानाचे नूतनीकरण, सोलर पथदीप व्यवस्था, गटार बांधकाम आणि रस्त्यांचे डांबरीकरण अशा एकूण सात विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल भाजपा नगरसेवकांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे आभार मानले.

कणकवली शहरातील टेंबवाडी गार्डनच्या नूतनीकरणासाठी २० लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मसुरकर किनाई रस्त्यावर सोलर पथदीप व्यवस्था करण्यासाठी २० लाख रुपये, बांधकरवाडी तिठा ते दत्त मंदिर रस्त्यावर सोलर पथदीप उभारण्यासाठी १० लाख रुपये, तर जाळकेवाडी गोवेकर घर ते ढालकाठी रस्त्यावर सोलर पथदीप व्यवस्था करण्यासाठी १० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच हर्णे आळी येथे बांदेकर यांच्या घराशेजारी गटार बांधकाम करण्यासाठी २० लाख रुपये, मधलीवाडी येथे सुरेश राणे यांच्या घरापासून सुतारवाडीपर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी १५ लाख रुपये, तर निम्मेवाडी येथे करंबेळकर यांच्या घरापासून सुतारवाडीपर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी १० लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या सात विकासकामांसाठी एकूण १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, यामुळे कणकवली शहरातील विविध भागांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास होण्यास मदत होणार आहे. नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि शहरातील विकासकामांना चालना मिळावी, या दृष्टीने हा निधी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शहरातील विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल भाजपा नगरसेवकांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी नगरसेविका सुप्रिया नलावडे, मेघा सावंत, मनस्वी ठाणेकर, आर्या राणे, मेघा गांगण, प्रतीक्षा सावंत आदी उपस्थित होते.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →