शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• सिंधुदुर्गातील जलसंधारणाच्या शाश्वत उपाययोजनाना मिळणार• सासोली येथे नूतन तलाठी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण• वनरक्षक महिलेच्या आत्महत्याप्रकरणी आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर• ज्ञानेश कुमारांचा राजीनामा न झाल्यास वैभववाडीत आंदोलन छेडणार• वापरत नसलेला चारा कापणी व वाहतुकीचे नियोजन करण्याचे निर्देश-पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांच्या सूचना• सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनराई बंधाऱ्यांची लोकचळवळ बनल्याचे समाधान - पालकमंत्री नितेश राणे• जलजीवन मिशनची रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री आक्रमक!• *प्रखर हिंदुत्ववादी नेते तथा मंत्री नितेश राणे यांनी दाखवून दिला प्रखर राष्ट्राभिमान!• प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदगाव येथे ‘सिंधू जनसंवाद आरोग्य यात्रे’चा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ• पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याहस्ते हेत येथे कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन• सिंधुदुर्गातील जलसंधारणाच्या शाश्वत उपाययोजनाना मिळणार• सासोली येथे नूतन तलाठी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण• वनरक्षक महिलेच्या आत्महत्याप्रकरणी आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर• ज्ञानेश कुमारांचा राजीनामा न झाल्यास वैभववाडीत आंदोलन छेडणार• वापरत नसलेला चारा कापणी व वाहतुकीचे नियोजन करण्याचे निर्देश-पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांच्या सूचना• सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनराई बंधाऱ्यांची लोकचळवळ बनल्याचे समाधान - पालकमंत्री नितेश राणे• जलजीवन मिशनची रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री आक्रमक!• *प्रखर हिंदुत्ववादी नेते तथा मंत्री नितेश राणे यांनी दाखवून दिला प्रखर राष्ट्राभिमान!• प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदगाव येथे ‘सिंधू जनसंवाद आरोग्य यात्रे’चा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ• पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याहस्ते हेत येथे कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन

सासोली येथे नूतन तलाठी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण

📅 १७ ऑक्टोबर, २०२६👁 ३ब्रेकिंग#nitesh rane#zp sindhudurg
सासोली येथे नूतन तलाठी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण

*कोंकण एक्सप्रेस

*सासोली येथे नूतन तलाठी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण

*१४.५८ लाख रुपये खर्चून सुसज्ज कार्यालयाची उभारणी

*दोडामार्ग : प्रतिनिधि

तालुक्यातील सासोली येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून १४.५८ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नूतन तलाठी कार्यालयाचे लोकार्पण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या कार्यालयीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेंतर्गत या कामासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली आरसीसी फ्रेम, लाल विटांच्या भिंती, अंतर्गत व बाह्य गिलावा, व्हिट्रिफाइड फरशी आणि रंगकाम अशा कामांचा समावेश असलेल्या या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. नव्या कार्यालयामुळे सासोली परिसरातील नागरिकांना महसुली कामकाजासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार असून, शासकीय सेवा अधिक सुलभतेने मिळण्यास मदत होणार आहे.

या लोकार्पण सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापती पार्वती गवस, सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी वीरसिंग वसावे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांच्यासह दोडामार्गचे तहसीलदार राहुल गुरव, सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी सीमा गोवेकर उपस्थित होते. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नूतन तलाठी कार्यालयात महसूल विभागाच्या ई-प्रणालीविषयक सुविधांची माहिती नागरिकांना सहज उपलब्ध व्हावी, यासाठी क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांनी या क्यूआर कोडचे स्कॅनिंग करून संबंधित सुविधांची पाहणी केली आणि डिजिटल माध्यमातून महसूलविषयक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाची माहिती घेतली. ई-प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना महसूलविषयक माहिती मिळविणे अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात