शिरवल खासकिलवाडीत संदीप चौकेकर मित्रमंडळाचा महिलांसाठी आरोग्य व स्वच्छता अभियानाचा उपक्रम!

*कोंकण एक्सप्रेस
*शिरवल खासकिलवाडीत संदीप चौकेकर मित्रमंडळाचा महिलांसाठी आरोग्य व स्वच्छता अभियानाचा उपक्रम!
*‘सेवा संकल्प’ कार्यक्रमांतर्गत आरोग्य व सल्ला शिबिराचे उद्घाटन; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
*कणकवली : प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील शिरवल खासकिलवाडी येथे संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून महिलांसाठी आरोग्य व स्वच्छता अभियानांतर्गत आरोग्य व सल्ला शिबिराचे आयोजन करण्यात आले. ‘सेवा संकल्प’ कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन संदीप चौकेकर मित्रमंडळाचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराला परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नवरात्र उत्सवाच्या काळात देवीच्या उपासनेसह सामाजिक बांधिलकी जपत महिलांच्या आरोग्यविषयक प्रश्नांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, स्वच्छतेच्या सवयी अंगीकाराव्यात तसेच आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास योग्य सल्ला घ्यावा, या दृष्टीने अशा शिबिरांचे महत्त्व अधोरेखित होते.
या आरोग्य शिबिरासाठी शिरवल येथील समुदाय आरोग्य अधिकारी मयुरी कलमितस्कर, आरोग्य सेवक दत्ताराम सुर्वे, प्रयोगशाळा कर्मचारी, आशा सेविका मेधना पांचाळ आणि मदतनीस अनिता घाडीगांवकर यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.
यावेळी समीक्षा चौकेकर, कृष्णा यादव, विजय चौकेकर, दत्ताराम पेडूरकर, वसंत पेडूरकर, रामचंद्र गोळवणकर, कृष्णा गावडे, कविता गावडे, आरती गावडे, रामचंद्र गावडे, राजाराम दळवी, अरुण चौकेकर, जयश्री चौकेकर, श्रद्धा यादव, अजय चौकेकर, तेजस चौकेकर, रूप रुपेश चौकेकर आणि पल्लवी पेडूरकर आदी उपस्थित होते.
संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने राबविण्यात आलेला हा सामाजिक उपक्रम महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला. धार्मिक उत्सवाला सामाजिक सेवेची जोड देत महिलांच्या आरोग्य आणि स्वच्छतेचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
जाहिरातकणकवली मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगकोमसापच्या कणकवली शाखा अध्यक्षपदी गणेश जेठे
ब्रेकिंगकणकवली शहरातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरसेवकांनी मानले पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार
ब्रेकिंगशिरवल खासकीलवाडीतील रस्त्याची दुरवस्था

