वापरत नसलेला चारा कापणी व वाहतुकीचे नियोजन करण्याचे निर्देश-पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांच्या सूचना

*कोंकण एक्सप्रेस
*जळून नष्ट होणारा चारा वैरण म्हणून राज्यातील दुष्काळी जिल्ह्यांना देण्याचं नियोजन करा:
*पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांच्या सूचना
*सिंधुदुर्गातील ३ लाख ८० हजार मेट्रिक टन वैरणच्या उपलब्धतेचा आढावा;
*वापरत नसलेला चारा कापणी व वाहतुकीचे नियोजन करण्याचे निर्देश
*सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
राज्यातील दुष्काळ परिस्थिती आणि शेतीवर झालेला परिणाम लक्षात घेता पशुधनासाठी चारा उपलब्धतेचा प्रश्न महत्त्वाचा बनला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनावरांसाठी ३,८०,००० मेट्रिक टन वैरण उपलब्ध आहे. तो पुरेसा असेल तर एरवी जळून नष्ट होणारा माळ रानातील चारा कापून तो राज्यातील दुष्काळी जिल्ह्यासाठी देण्यासाठी तातडीने उपाय योजना करा असे आदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी सिंधुदुर्गनगरी येथील बैठकीत दिले.
दुष्काळाची परिस्थिती व त्यानुसार नियोजन, जिल्ह्यातील पशुधन व या जनावरांची वैरण व्यवस्था याचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, उपाध्यक्ष दादा साईल, पशुसंवर्धन अधिकारी समीर बिलोलीकर उपस्थित होते.
पावसाच्या अनियमिततेमुळे ग्रामीण भागातील शेती आणि पशुपालनासमोर आव्हाने निर्माण झाली आहेत. पशुधनाला पुरेसा चारा उपलब्ध व्हावा, तसेच संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करावे अशा सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या. तसेच हिरव्या चारासाठी मका बियाणे उपलब्ध करून दिले तर त्यासाठी लागणारे पाणी हा ही अडचणीचा विषय ठरेल त्यामुळे त्याचेही नियोजन करून निर्णय घ्यावा असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
जाहिरातसिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगसिंधुदुर्ग जिल्ह्यात वनराई बंधाऱ्यांची लोकचळवळ बनल्याचे समाधान - पालकमंत्री नितेश राणे
ब्रेकिंगजलजीवन मिशनची रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री आक्रमक!
ब्रेकिंगसिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा स्तुत्य उपक्रम : वनराई बंधाऱ्यांसाठी २५ हजार पिशव्यांचे वितरण
ब्रेकिंग