गुणवत्ता युक्त शिक्षणाची कास धरू हिच योगात्मा डॉ.काकासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल-श्री.सुनील नाईक

*कोंकण एक्सप्रेस
*गुणवत्ता युक्त शिक्षणाची कास धरू हिच योगात्मा डॉ.काकासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल-श्री.सुनील नाईक
*मालवण : प्रतिनिधी
आजच्या आधुनिक युगात शिक्षणाच्या संधी तळागाळापर्यंत पोहोचली आहे. पण या संधी पोहोचण्यासाठी ज्या महात्मानी, विचारवंतांनी समाजसुधारकांनी जो पाया घातला तो महत्त्वाचा आहे. कट्टा दशक्रोशी मध्ये पारतंत्र्याच्या काळात आपल्या लोकांनाही शिक्षण मिळावे व ते सज्ञान व्हावेत हा उदात्त विचार घेऊन योगात्मा डॉ. काकासाहेबांनी केलेले महान कार्याला कोणतीही तोड नाही.या कार्याचा वसा पुढे प्रा. श्री शरद वराडकर व डॉ. दादासाहेब वराडकर यांनी चालवला.यांचे ही कार्य उल्लेखनीय असून शतकोत्सव साजरी करणारी दशक्रोशीतील प्रशाला असून नर्सरी शिक्षण ते पदवी पर्यंत शिक्षणाच्या संधी निर्माण करणारी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था असून असे म्हणावे लागेल की आज पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी जशी या शिक्षणाच्या माध्यमातून संधी साधली तसेच आजच्या या पिढीने सुद्धा शिक्षणाची संधी साधावी व गुणवत्तापूर्ण तंत्रज्ञानयुक्त,शिक्षण आत्मसात करावे हीच डॉ.काका साहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल असे विचार योगात्माडॉ. काकासाहेब वराडकर यांच्या पन्नासाव्या पुण्यतिथीनिमित्त सिद्धिविनायक सभागृहामध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमात कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री सुनील नाईक यांनी काढले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने तसेच योगात्मा डॉ.काकासाहेब वराडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ देवयानी धनंजय गावडे यांनी प्रास्ताविकेतून डॉ. काकासाहेब वराडकर यांचे कार्य विशद करताना त्यानी निर्माण केलेल्या तसेच त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांच्या माध्यमातून आपले भवितव्य घडवूया यासाठी प्रशालेच्या वतीने शैक्षणिक गुणवत्तापूर्ण तंत्रज्ञानयुक्त उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबविले जात असून अनेक संधी विद्यार्थ्यांच्या साठी निर्माण झाले आहेत. या संधीतून विद्यार्थ्यांनी आपले भवितव्य घडवावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाच्या दरम्यान स्कूल कमिटी अध्यक्ष श्री बापू उर्फ सुधीर वराडकर यांनी काका साहेब गात असलेली प्रार्थना विद्यार्थ्यांसमोर गाऊन दाखविली यामुळे विद्यार्थ्यांच्या मध्ये एक प्रेरणा व उत्साह निर्माण झाला.
या या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनन्या पाटील ,गार्गी मसुरकर, कांचन संकपाळ, प्रणव ढोलम, ऋतुजा परब ,प्राची परब ,संचिता करावडे या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून योगात्मा डॉ. काकासाहेब वराडकर यांच्या विषयी ची माहिती व त्यांच्याबद्दल विचार मांडले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ.काकासाहेब यांचे आध्यात्मिक गुरू स्वामी शिवानंद यांच्या जीवनावर आधारित "उम्राणी स्वामी शिवानंद इंग्रजी निबंध स्पर्धेचा" निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये माध्यमिक गटातून- प्रथम वेदांत गुरुप्रकाश माडगूत, द्वितीय- ओंकार सागर रोहिलकर, वैदेही सतीश पाटकर ,
तृतीय -यामिनी नित्यानंद म्हाडगुत ,ईशा वल्लभ ताम्हणकर तर उच्च माध्यमिक गटातून:प्रथम- सौजन्य सावंत, द्वितीय- कृतिका बंधारे, तृतीय- रुचिका वराडकर या विद्यार्थ्यानी यश संपादन केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने
कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका स्वाती वराडकर, संचालक महेश वाईरकर ,डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. ध्वजेंद्र मिराशी, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक श्री ऋषी नाईक ,वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री महेश भाट, तिन्ही युनिटचे सर्व प्राध्यापक-प्राध्यापिका, शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक,हितचिंतक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय पेंडुरकर यांनी केले . तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री समीर चांदरकर यांनी केले यावेळी योगात्मा डॉ.काकासाहेब वराडकर यांना काव्यवाचनातून श्रद्धांजली वाहण्यात आली.
जाहिरात


