शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• सिंधुदुर्गातील जलसंधारणाच्या शाश्वत उपाययोजनाना मिळणार• सासोली येथे नूतन तलाठी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण• वनरक्षक महिलेच्या आत्महत्याप्रकरणी आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर• ज्ञानेश कुमारांचा राजीनामा न झाल्यास वैभववाडीत आंदोलन छेडणार• वापरत नसलेला चारा कापणी व वाहतुकीचे नियोजन करण्याचे निर्देश-पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांच्या सूचना• सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनराई बंधाऱ्यांची लोकचळवळ बनल्याचे समाधान - पालकमंत्री नितेश राणे• जलजीवन मिशनची रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री आक्रमक!• *प्रखर हिंदुत्ववादी नेते तथा मंत्री नितेश राणे यांनी दाखवून दिला प्रखर राष्ट्राभिमान!• प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदगाव येथे ‘सिंधू जनसंवाद आरोग्य यात्रे’चा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ• पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याहस्ते हेत येथे कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन• सिंधुदुर्गातील जलसंधारणाच्या शाश्वत उपाययोजनाना मिळणार• सासोली येथे नूतन तलाठी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण• वनरक्षक महिलेच्या आत्महत्याप्रकरणी आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर• ज्ञानेश कुमारांचा राजीनामा न झाल्यास वैभववाडीत आंदोलन छेडणार• वापरत नसलेला चारा कापणी व वाहतुकीचे नियोजन करण्याचे निर्देश-पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांच्या सूचना• सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनराई बंधाऱ्यांची लोकचळवळ बनल्याचे समाधान - पालकमंत्री नितेश राणे• जलजीवन मिशनची रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री आक्रमक!• *प्रखर हिंदुत्ववादी नेते तथा मंत्री नितेश राणे यांनी दाखवून दिला प्रखर राष्ट्राभिमान!• प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदगाव येथे ‘सिंधू जनसंवाद आरोग्य यात्रे’चा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ• पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याहस्ते हेत येथे कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन

वनरक्षक महिलेच्या आत्महत्याप्रकरणी आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर

📅 १७ ऑक्टोबर, २०२६👁 १३ब्रेकिंग
वनरक्षक महिलेच्या आत्महत्याप्रकरणी आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर

*कोंकण एक्सप्रेस

*वनरक्षक महिलेच्या आत्महत्याप्रकरणी आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर

*कणकवली : प्रतिनिधी

आंबोली वनविभगाातील केसरी बिट येथील वनरक्षक अश्लेषा सागर मांगले (मुळ आजरा) हिला लग्नाचे आमिष दाखवून फेवणूक केली. तसेच तीच्या आत्महत्येनंतर मोबाईलमधील डाटा डिलीट करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी देवसू येथील वनरक्षक सनिकेत सतीश पाटील (वाळवा, जि. सांगली) याला अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस. एस. इंदलकर यांनी २५ हजार रुपयांचा सशर्थ अटकपूर्व जामिन मंजूर केला. आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.

अश्लेषा व सनिकेत यांचे प्रेमसंबंध होते. त्याने अश्लेषाला लग्नाचे बचन दिले होते. याबाबत आश्लेषाने १२ ऑगस्ट रोजी गावी गेली असता आपल्या आईला सांगितले होते. त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी आपल्या आईशी नेहमीप्रमाणे बोलणे झाले होते. १६ ऑगस्ट २०२६ रोजी दु. ३ वा.पुर्वी अश्लेषा हीने माडखोल धबडकी येथील राहत असलेल्या भाड्याच्या घरात आत्महत्या केली होती. आत्महत्येनंतर आरोपी त्याठिकाणी पोहोचला. घरमालक श्री. गोवेकर व बाजूच्या डॉक्टर श्री. चव्हाण यांना कल्पना न देता त्याने अश्लेषाला गळफास साडवून खाली घेतले. तीच्या मोबाईलमधील व्हॉटस्अप चॅट व इतर डाटा डिलीट केला.

याबाबत तीचे वडिल सागर मांगले यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद देत लग्नाचे आमिष दाखवत लैंगिक अत्याचार करून लग्नास नकार दिल्याच्या नैराश्येतून तीने आत्महत्या केल्याचे म्हटले होते. त्यानुसार भा.न्या.सं. १०८, २३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत आरोपीने सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी होत न्यायालयाने २५ हजारांचा अटक पुर्व जामिन मंजूर करताना पोलीसांना तपासात सहकार्य करावे, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष फिर्यादींशी संपर्क साधू नये आदी अटी घातल्या आहेत.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या

अधिक पहा →