शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• दिवाळीनिमित्त कणकवलीत दोन दिवस रंगणार सुरेल संगीताची मैफल!• सिंधुदुर्गात क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या संघटनात्मक बांधणीला वेग• वेंगुर्ला तालुक्यात वसुबारस उत्साहात; गोमातेचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त• पाणी वाचवा, जीवन वाचवा संदेश देणारे आकर्षक पारंपरिक आकाशकंदील!• भाजपाच्या कार्यालयातच ठेकेदार पदाधिकाऱ्यांमध्ये हमरीतुमरी!• पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी केलेल्या उपोषणाला चार दिवस झाले तरी उपोषण स्थळी जिल्हाधिकारी फिरकल्या नाहीत• केंद्र शाळा साळशी नं. १ शाळेच्या शिक्षिका स्मिता कोदले यांना राज्यस्तरीय ‘आयडॉल टीचर’ पुरस्कार• बंद झालेली महालॅबची प्रयोगशाळा व रक्तनमुना संकलन सेवा तात्काळ पूर्ववत करा• नागपूरमध्ये ‘युवा शंखनाद’च्या माध्यमातून तरुणांचा हुंकार• ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी आम्ही काम करतो - राजस रेगे• दिवाळीनिमित्त कणकवलीत दोन दिवस रंगणार सुरेल संगीताची मैफल!• सिंधुदुर्गात क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या संघटनात्मक बांधणीला वेग• वेंगुर्ला तालुक्यात वसुबारस उत्साहात; गोमातेचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त• पाणी वाचवा, जीवन वाचवा संदेश देणारे आकर्षक पारंपरिक आकाशकंदील!• भाजपाच्या कार्यालयातच ठेकेदार पदाधिकाऱ्यांमध्ये हमरीतुमरी!• पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी केलेल्या उपोषणाला चार दिवस झाले तरी उपोषण स्थळी जिल्हाधिकारी फिरकल्या नाहीत• केंद्र शाळा साळशी नं. १ शाळेच्या शिक्षिका स्मिता कोदले यांना राज्यस्तरीय ‘आयडॉल टीचर’ पुरस्कार• बंद झालेली महालॅबची प्रयोगशाळा व रक्तनमुना संकलन सेवा तात्काळ पूर्ववत करा• नागपूरमध्ये ‘युवा शंखनाद’च्या माध्यमातून तरुणांचा हुंकार• ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी आम्ही काम करतो - राजस रेगे

केंद्र शाळा साळशी नं. १ शाळेच्या शिक्षिका स्मिता कोदले यांना राज्यस्तरीय ‘आयडॉल टीचर’ पुरस्कार

📅 ६ नोव्हेंबर, २०२६👁 २९ब्रेकिंग
केंद्र शाळा साळशी नं. १ शाळेच्या शिक्षिका स्मिता कोदले यांना राज्यस्तरीय ‘आयडॉल टीचर’ पुरस्कार

*कोंकण एक्सप्रेस

*केंद्र शाळा साळशी नं. १ शाळेच्या शिक्षिका स्मिता कोदले यांना राज्यस्तरीय ‘आयडॉल टीचर’ पुरस्कार

*साळशी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा

*शिरगाव : संतोष साळसकर

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘आयडॉल टीचर पुरस्कार’देवगड तालुक्यातील केंद्र साळशी नं. १ शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सौ. स्मिता सुनील कोदले यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या या निवडीमुळे साळशी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, देवगड तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

स्मिता कोदले या अध्यापन कार्यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम, गुणवत्तापूर्ण अध्यापन, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, विविध शैक्षणिक स्पर्धांमध्ये सहभागासाठी प्रोत्साहन देणे, तसेच शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन अशा विविध क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.

विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धती, शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी घेतलेले प्रयत्न आणि शाळेच्या प्रगतीसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती व प्रशाळेच्या वतीने स्मिता कोदले यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रभाकर साळसकर, राजेंद्र साटम, पोलीस पाटील कामिनी नाईक, केंद्रप्रमुख सुनील कोदले, केंद्रमुख्याध्यापक प्रकाश झाडे, केंद्रातील शिक्षकवृंद, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

त्यांच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, ग्रामस्थ, पालक व शिक्षणप्रेमींनी अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

देवगड मधील अधिक बातम्या

अधिक पहा →