शिरगांव तांत्रिक विद्यालयच्या नामांतराला तीव्र विरोध

*कोंकण एक्सप्रेस
*शिरगांव तांत्रिक विद्यालयच्या नामांतराला तीव्र विरोध
*कै. पुंडलिक कर्ले यांचे नाव देण्याची ग्रामस्थांची एकमुखी मागणी
*शिरगाव : संतोष साळसकर
देवगड तालुक्यातील शिरगाव-राकसघाटी येथील शासकीय तांत्रिक विद्यालयास माजी आमदार कै. आप्पासाहेब गोगटे यांचे नाव देण्याच्या शासन निर्णयाला शिरगाव दशक्रोशीतील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. ३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या ग्रामस्थांच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला असून, विद्यालयासाठी विनामूल्य जमीन दान करणारे शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे संस्थापक अध्यक्ष कै. पुंडलिक अंबाजी कर्ले यांचे नाव या विद्यालयाला देण्यात यावे, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सन १९८४ मध्ये सुरू झालेल्या या विद्यालयाच्या उभारणीसाठी पुंडलिक अंबाजी कर्ले यांनी विनामूल्य इमारत व जमीन दिली होती. त्यांच्या या त्यागामुळेच विद्यालयाची स्थापना सुकर झाली. त्यामुळे शासनाने गावाच्या ऐतिहासिक योगदानाचा आणि जनभावनांचा आदर करावा, अशी एकमुखी भूमिका मांडण्यात आली. दरम्यान, येत्या ४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत याबाबत सर्वानुमते अंतिम निर्णय घेऊन नोव्हेंबर ग्रामसभेत अंतिम घेऊन तो शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे ठरले.
या सभेस विजयकुमार कदम, संभाजी साटम, मिलिंद साटम, संदीप साटम, अमित साटम, संजय रुपये, मंगेश लोके, विनायक साटम, अशोक चौककर, देवदत्त कदम, शरद फाटक, सुधीर साटम, भालचंद्र बागवे, दिपक नाईक, गोविंद परब, प्रकाश धोपटे, बंडू माने, सुरेश जाधव आदिसह दशक्रोशीतील ग्रामस्थ उपस्तित होते.
जामसंडे येथील आंदोलनांची आठवण
१९९६-९७ मध्ये देवगड तालुक्यासाठी मंजूर झालेली औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिरगाव ऐवजी जामसंडे येथे नेण्यात आली होती. त्यावेळी शिरगावच्या जनतेने उपोषणे, निदर्शने आणि रास्ता रोको आंदोलनांच्या माध्यमातून तीव्र विरोध केला होता. या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर जनभावनांचा विचार न करणे अन्यायकारक ठरेल, असे सभेत स्पष्ट करण्यात आले.
स्थानिक महनीय व्यक्तीचे नाव द्या: प्रकाश गोगटे
१) जामसंडे येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस आधीच आप्पासाहेबांचे नाव दिलेले आहे.
2) शिरगावच्या तांत्रिक विद्यालयास आप्पासाहेब गोगटे यांचे नाव देण्याची कोणतीही मागणी गोगटे कुटुंबीयांनी केलेली नाही.
3) संस्था उभारणीत योगदान दिलेल्या स्थानिक महनीय व्यक्तीचे नाव देण्यास गोगटे कुटुंबीयांची पूर्ण संमती असल्याचे प्रकाश गोगटे यांनी स्पष्ट केले आहे.
जाहिरातदेवगड मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंग*'Konkan Express' च्या दणक्यामुळे बांधकाम विभागाला खडबडून जाग; साईडपट्टीलाही केला भराव*
ब्रेकिंगदेवगडच्या विकासाचा ‘राणे पॅटर्न
ब्रेकिंगदेवगड किल्ल्याच्या ऐतिहासिक खंदकात साकारणार नयनरम्य उद्यान!
ब्रेकिंग