शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• दिवाळीनिमित्त कणकवलीत दोन दिवस रंगणार सुरेल संगीताची मैफल!• सिंधुदुर्गात क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या संघटनात्मक बांधणीला वेग• वेंगुर्ला तालुक्यात वसुबारस उत्साहात; गोमातेचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त• पाणी वाचवा, जीवन वाचवा संदेश देणारे आकर्षक पारंपरिक आकाशकंदील!• भाजपाच्या कार्यालयातच ठेकेदार पदाधिकाऱ्यांमध्ये हमरीतुमरी!• पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी केलेल्या उपोषणाला चार दिवस झाले तरी उपोषण स्थळी जिल्हाधिकारी फिरकल्या नाहीत• केंद्र शाळा साळशी नं. १ शाळेच्या शिक्षिका स्मिता कोदले यांना राज्यस्तरीय ‘आयडॉल टीचर’ पुरस्कार• बंद झालेली महालॅबची प्रयोगशाळा व रक्तनमुना संकलन सेवा तात्काळ पूर्ववत करा• नागपूरमध्ये ‘युवा शंखनाद’च्या माध्यमातून तरुणांचा हुंकार• ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी आम्ही काम करतो - राजस रेगे• दिवाळीनिमित्त कणकवलीत दोन दिवस रंगणार सुरेल संगीताची मैफल!• सिंधुदुर्गात क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या संघटनात्मक बांधणीला वेग• वेंगुर्ला तालुक्यात वसुबारस उत्साहात; गोमातेचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त• पाणी वाचवा, जीवन वाचवा संदेश देणारे आकर्षक पारंपरिक आकाशकंदील!• भाजपाच्या कार्यालयातच ठेकेदार पदाधिकाऱ्यांमध्ये हमरीतुमरी!• पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी केलेल्या उपोषणाला चार दिवस झाले तरी उपोषण स्थळी जिल्हाधिकारी फिरकल्या नाहीत• केंद्र शाळा साळशी नं. १ शाळेच्या शिक्षिका स्मिता कोदले यांना राज्यस्तरीय ‘आयडॉल टीचर’ पुरस्कार• बंद झालेली महालॅबची प्रयोगशाळा व रक्तनमुना संकलन सेवा तात्काळ पूर्ववत करा• नागपूरमध्ये ‘युवा शंखनाद’च्या माध्यमातून तरुणांचा हुंकार• ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी आम्ही काम करतो - राजस रेगे

पाणी वाचवा, जीवन वाचवा संदेश देणारे आकर्षक पारंपरिक आकाशकंदील!

📅 ६ नोव्हेंबर, २०२६👁 ८ब्रेकिंग
पाणी वाचवा, जीवन वाचवा संदेश देणारे आकर्षक पारंपरिक आकाशकंदील!

*कोंकण एक्सप्रेस

*पाणी वाचवा, जीवन वाचवा संदेश देणारे आकर्षक पारंपरिक आकाशकंदील!

*विद्यामंदिर हायस्कूल कणकवलीत उत्साहात संपन्न झाली पारंपरिक आकाशकंदील स्पर्धा *

*कणकवली : प्रतिनिधी

दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण मानला जातो. कोकणातील पारंपरिक संस्कृती जतन व्हावी आणि विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग संवर्धनाबद्दल जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली येथे नुकतीच पारंपरिक आकाशकंदील स्पर्धा उत्साहात पार पडली. यावर्षीच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी 'पाणी वाचवा, जीवन वाचवा' हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि पर्यावरणपूरक विषय आपल्या कलेतून साकारला.

​कोकणातील पारंपरिक संस्कृती (जसे की वेताच्या काट्यांचे आकाशकंदील, रांगोळ्या, शेणाचे सारवण इ.) बाजारातील चायनामेड वस्तू आणि प्लास्टिक स्टिकर्समुळे मागे पडत चालली आहे. ही संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी विद्यामंदिर हायस्कूलमध्ये गेली ६ ते ७ वर्षे नियमितपणे पारंपरिक आकाशकंदील स्पर्धा आयोजित केली जाते. याही वर्षी प्रशालेतील इयत्ता ५ वी ते १० वीच्या २५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वतःच्या हाताने सुंदर व आकर्षक आकाशकंदील तयार करून आणले होते.

​या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सौ. गौरी पाटील मॅडम, नगराध्यक्ष श्री. संदेश जी. पारकर साहेब, शहर समन्वयक जयश्री ठाकरे मॅडम, स्वच्छता निरीक्षक ध्वजा उचले, सहायक कर निरीक्षक स्वप्निल पवार, नेहा तळेकर मॅडम, तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे, पर्यवेक्षक श्री. ए. व्हि. वनवे, श्री. जनार्दन शेळके, श्री. पृथ्वीराज बर्डे, श्री. राजेश सिंगनाथ, श्री. सुधीन पेडणेकर, सौ. संगीता साटम, सौ. मनीषा पाटील आणि आयोजक तथा कलाशिक्षक श्री. प्रसाद राणे आदी मान्यवर उपस्थित होते.

​या प्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्याधिकारी सौ. गौरी पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पारंपारिक आकाशकंदीलांचे व त्यांच्या कलेचे कौतुक केले, तसेच भविष्यात पाणी वाचवण्याची गरज याविषयी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. नगराध्यक्ष श्री. संदेश जी. पारकर यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकुसरीचे कौतुक करत, अशा उपक्रमांमधूनच भविष्यातील उत्तम व्यावसायिक तयार होतील, असे गौरवोद्गार काढले.

​ही स्पर्धा गट १ (पाचवी ते सातवी) आणि गट २ (आठवी ते दहावी) अशा दोन गटांमध्ये पार पडली. स्पर्धेतील उत्कृष्ट आकाशकंदील बनवणाऱ्या विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रोत्साहनपर भेटवस्तू देण्यात आली. या उपक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन डॉ. श्री. नागवेकर, श्री. सौरभ संदेश पारकर, पंचायत समिती सदस्य सन्मा. श्री. मिलिंद मेस्त्री, श्री. महेश सावंत, प्रशालेच्या लिपीक सौ. मनीषा पाटील, सौ. कुलकर्णी मॅडम या दात्यांचे आर्थिक योगदान लाभले. तसेच सर्व चतुर्थ कर्मचारी वर्गाची योगदान लाभले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या आणि सामाजिक संदेश देणाऱ्या विद्यामंदिर हायस्कूलच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →