भाजपाच्या कार्यालयातच ठेकेदार पदाधिकाऱ्यांमध्ये हमरीतुमरी!

*कोंकण एक्सप्रेस
*भाजपाच्या कार्यालयातच ठेकेदार पदाधिकाऱ्यांमध्ये हमरीतुमरी!
*कामाच्या वाटपावरून दोन पदाधिकारी आमनेसामने; ज्येष्ठ नेत्याने मध्यस्थी करत वाद मिटवला
*वैभववाडी : प्रतिनिधी
ठेकेदारीच्या कामाच्या वाटपावरून भाजपचे ठेकेदार-कम-पदाधिकारी असलेल्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये चक्क भाजपच्या कार्यालयातच हमरीतुमरी झाल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. ज्येष्ठ पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीतच दोघे एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने तालुका भाजपातील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
वैभववाडी तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून भाजपमध्ये जुने-नवे असा अंतर्गत वाद सुरू असल्याची चर्चा आहे. अधूनमधून या वादाचे पडसादही उमटताना दिसत आहेत. त्यातच चार दिवसांपूर्वी तालुक्यातील ठेकेदार संघटनेची बैठक भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विकासकामांच्या वाटपावरून ठेकेदार-कम-पदाधिकारी असलेल्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला.
वादाचे रूपांतर हमरीतुमरीत झाल्याने दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे बैठकीच्या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून दोघांनाही बाजूला केले आणि वाद शांत केला. मात्र, या घटनेची चर्चा सध्या तालुक्यात जोरदार सुरू आहे.
विकासकामांच्या वाटपावरून धुसफूस?
तालुक्यात भाजपशी संबंधित बहुतांश पदाधिकारी हे ठेकेदारीच्या व्यवसायात आहेत काही पदाधिकारी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे ठेकेदारीची कामे करीत असल्याचेही बोलले जाते.यापूर्वी ही रेल्वे स्थानक येथील रस्त्याच्या कामावरून दोन पदाधिकारी यांच्यात भर रेल्वे स्थानक येथे वाद उफाळून आला होता.तालुक्यातील भाजपा अंतर्गत जुने - नावे वाद असल्याचे बोलले जात होते आत हळूहळू हे वाद उफाळून येताना दिसत आहेत तालुक्यात विविध विकासकामांच्या वाटपावरून पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद असल्याची चर्चा यापूर्वीही होती. याच कामांच्या वाटपावरून बैठकीत वाद झाल्याची चर्चा आता रंगली आहे.
दरम्यान, पक्षाच्या कार्यालयातच पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या या प्रकारामुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले असून, वरिष्ठ नेते या वादावर काय भूमिका घेतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
जाहिरातवैभववाडी मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगनानिवडे-वाडेकरवाडी प्रकल्पाचा 16 वर्षांचा वनवास संपला

वैभववाडी तालुक्यातील विविध नवरात्रोत्सव मंडळांना पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतल्या भेटी
ब्रेकिंगज्ञानेश कुमारांचा राजीनामा न झाल्यास वैभववाडीत आंदोलन छेडणार
ब्रेकिंग