*'Konkan Express' च्या दणक्यामुळे बांधकाम विभागाला खडबडून जाग; साईडपट्टीलाही केला भराव*
अखेर शिरगाव-साळशी मार्गावरील धोकादायक लोखंडी बॅरल हटवली!

*कोंकण एक्सप्रेस*
*अखेर शिरगाव-साळशी मार्गावरील धोकादायक लोखंडी बॅरल हटवली!*
*'Konkan Express' च्या दणक्यामुळे बांधकाम विभागाला खडबडून जाग; साईडपट्टीलाही केला भराव*
*शिरगांव (संतोष साळसकर):*
देवगड तालुक्यातील शिरगाव-साळशी मार्गावरील माडखोल भागात असणाऱ्या धोकादायक वळणावर ठेवण्यात आलेल्या लोखंडी बॅरल अखेर हटवण्यात आल्या आहेत. या गंभीर समस्येबाबतचे वृत्त 'Konkan Express' ने सचित्र आणि ठळकपणे प्रसिद्ध केले होते. या बातमीची गंभीर दखल घेत, उशिरा का होईना पण खडबडून जागे झालेल्या बांधकाम विभागाने तत्काळ कार्यवाही करत संभाव्य मोठा अपघात टळला आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा खचलेली साईडपट्टी मातीचा भराव टाकून सुरक्षित करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पंचक्रोशीतील प्रवासी आणि वाहनचालकांमधून मोठे समाधान व्यक्त होत आहे.
काय होता नेमका प्रकार?
खारेपाटण, वेळगिवे, ओंबळ, शिरगाव, साळशी, कुवळे, सांडवे, रामगडमार्गे मालवण जिल्हा मार्ग क्रमांक ९ वरील शिरगाव-साळशी रस्त्यावर माडखोल येथील एका धोकादायक वळणावर रस्ता खचला होता. या ठिकाणी सुरक्षेचा उपाय म्हणून केवळ रिकामी लोखंडी बॅरल उभी करण्यात आली होती. मात्र, या बॅरल्सवर ना पांढरे पट्टे मारण्यात आले होते, ना रात्रीच्या वेळी वाहनचालकांना दूरवरून दिसेल अशी कोणतीही रेडियमची सोय होती; ज्यामुळे प्रवाशांच्या जीवाला सतत धोका निर्माण झाला होता.
'Konkan Express' च्या बातमीचा प्रभाव:
'Konkan Express' वर ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या पाचच दिवसांत बांधकाम विभागाचे अधिकारी तातडीने जेसीबीनिशी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ पावले उचलत रस्त्यावरील धोकादायक लोखंडी बॅरल हटवले आणि खचलेल्या साईडपट्टीची दुरुस्ती करून मातीचा भराव भरला.
जनहितार्थ मांडलेल्या या प्रश्नावर प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेबद्दल आणि 'Konkan Express' ने केलेल्या यशस्वी पाठपुराव्याबद्दल आता वाहनचालक व ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
जाहिरातदेवगड मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगशिरगांव तांत्रिक विद्यालयच्या नामांतराला तीव्र विरोध
ब्रेकिंगदेवगडच्या विकासाचा ‘राणे पॅटर्न
ब्रेकिंगदेवगड किल्ल्याच्या ऐतिहासिक खंदकात साकारणार नयनरम्य उद्यान!
ब्रेकिंग