पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी केलेल्या उपोषणाला चार दिवस झाले तरी उपोषण स्थळी जिल्हाधिकारी फिरकल्या नाहीत

*कोंकण एक्सप्रेस
*पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी केलेल्या उपोषणाला चार दिवस झाले तरी उपोषण स्थळी जिल्हाधिकारी फिरकल्या नाहीत
*मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत व्यक्त केली नाराजी
*पिंगुळी ग्रामस्थांच्या मागण्या तात्काळ मान्य करण्याची केली मागणी; जिल्हाधिकारी सकारात्मक
*कुडाळ :प्रतिनिधी
पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी केलेल्या उपोषणाबाबत आज ग्रामस्थांच्या वतीने मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक,माजी आमदार परशुराम उपरकर, मनसे नेते शिरीष सावंत, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, मनसे जिल्हाप्रमुख धिरज परब, श्री दळवी यांच्या शिष्टमंडळाने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन चर्चा केली. पिंगुळीतील पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांचे गेले चार दिवस कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु आहे. मात्र पिंगुळी ग्रामस्थांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी देखील जिल्हाधिकारी त्याठिकाणी फिरकल्या नाहीत त्याबाबत शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा करत नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांनी पिंगुळी ग्रामस्थांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात जेणेकरून ग्रामस्थांचे उपोषण सोडविण्याचा मार्ग मोकळा होईल अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे यावेळी करण्यात आली.यावेळी गृहनिर्माण प्रकल्पाचे रेखांकन आणि विकासकाच्या बांधकामाला स्थगितीचे पत्र देण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
जाहिरातकुडाळ मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगमाणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंडपाचा लोकार्पण सोहळा
ब्रेकिंगमा. खास. विनायक राऊत साहेब यांनी पाझर तलाव उपोषणास दिली भेट
ब्रेकिंगएमआयडीसीमध्ये राणेंच्या कंपन्यांनी घेतलेल्या जागांवर आधी उद्योग सुरू करा, मगच २१ व्या शतकातील कुडाळ एमआयडीसी साकारण्याच्या बाता मारा
ब्रेकिंग