रक्तवीर राजेंद्र साळसकर यांना नॅशनल ॲवॉर्ड -२०२६ प्रदान

*कोंकण एक्सप्रेस
*रक्तवीर राजेंद्र साळसकर यांना नॅशनल ॲवॉर्ड -२०२६ प्रदान
*निस्पृह रक्तदान व सामाजिक कार्याचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान,तासगाव, सांगली येथे पुरस्कार प्रदान
*शिरगांव : संतोष साळसकर
शैक्षणिक, सामाजिक आणि रक्तदान क्षेत्रात नि:स्वार्थ भावनेने काम करणारे कार्यकर्ते व पत्रकार राजेंद्र साळसकर यांना त्यांच्या रक्तदान सेवा आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय सेवा कार्याबद्दल "नॅशनल ॲवॉर्ड" २०२६" या पुरस्काराने राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले आहे. ते मुंबई स्थित पत्रकार असून त्यांचे मुळ गाव देवगड तालुक्यातील साळशी हे आहे.
हा पुरस्कार सोहळा तासगांव, सांगली येथील समृद्धी सभागृहात नॅशनल ॲवॉर्ड सोहळा व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर, इंडिया आणि स्व.यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव सोहळा यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ, दिल्ली, तामिळनाडु, पंजाब, तेलंगना यासह देशभरातील विविध २२ राज्यातील १०८ सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर, इंडियाचे संस्थापक अध्यक्ष विक्रम यादव व स्व.यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीपआप्पा कदम यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत राजेंद्र साळसकर यांना "नॅशनल ॲवॉर्ड-२०२६" हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. साळसकर यांच्यासह मुंबईमधून सात जणांना या नॅशनल ॲवॉर्डने गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून स्व.यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदिप उर्फ आप्पा कदम, अखिल भारतीय पत्रकार परिषदेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष तुकाराम धायगुडे, पलूस तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चौगुले हे प्रमुख पाहुणे म्हणून याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर, इंडियाचे संस्थापक अध्यक्ष विक्रम यादव हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
मुंबई काळाचौकी येथे वास्तव्यास असलेले आणि पत्रकार म्हणून वेगळी ओळख असलेले राजेंद्र साळसकर यांना मिळालेल्या या राष्ट्रीय सन्मानामुळे रक्तदान चळवळीत तसेच सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांच्या कार्याचे सर्वच क्षेत्रातून कौतुक केले जात आहे.
जाहिरातदेवगड मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगकेंद्र शाळा साळशी नं. १ शाळेच्या शिक्षिका स्मिता कोदले यांना राज्यस्तरीय ‘आयडॉल टीचर’ पुरस्कार
ब्रेकिंगमहाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी; कर्नाटकची ‘सुलतान’ नौका जप्त!
ब्रेकिंग*'Konkan Express' च्या दणक्यामुळे बांधकाम विभागाला खडबडून जाग; साईडपट्टीलाही केला भराव*
ब्रेकिंग