सोमवार, २ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याच्या गुन्ह्यातून आरोपीची ससन्मान निर्दोष मुक्तता -अॅड. अशपाक शेख यांच्या युक्तिवादाला यश• बॉडी बिल्डिंगच्या मैदानात युवा नेते विशाल परब यांच्या वक्तृत्वाची तुफानी बॅटिंग!• जानेवारीत सिंपन चषक २०२७ क्रिकेट स्पर्धा• आ. प्रसाद लाड, स्वप्निल फाटक यांना समाजाची संस्था कदापी बळकावु देणार नाही• महिलांसाठी व्यावसायीक व्यासपिठ हा स्तुत्य उपक्रम-प्रभाकर सावंत• *इयत्ता १० वी व १२ वीच्या फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षांच्या आवेदनपत्रांना मुदतवाढ• आ. प्रसाद लाड, स्वप्निल फाटक यांना समाजाची संस्था कदापी बळकावु देणार नाही• ग्रामीण रस्त्यांवरील झाडी - झुडपांमुळे वाहनचालक, पादचारी हैराण• बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणारे शैक्षणिक थेट आर्थिक लाभ रद्द करून, मूलभूत वस्तू संच देण्याच्या निर्णयाला बांधकाम कामगार महासंघाचा तीव्र विरोध-जिल्हा सचिव हेमंतकुमार परब• अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची बदली• अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याच्या गुन्ह्यातून आरोपीची ससन्मान निर्दोष मुक्तता -अॅड. अशपाक शेख यांच्या युक्तिवादाला यश• बॉडी बिल्डिंगच्या मैदानात युवा नेते विशाल परब यांच्या वक्तृत्वाची तुफानी बॅटिंग!• जानेवारीत सिंपन चषक २०२७ क्रिकेट स्पर्धा• आ. प्रसाद लाड, स्वप्निल फाटक यांना समाजाची संस्था कदापी बळकावु देणार नाही• महिलांसाठी व्यावसायीक व्यासपिठ हा स्तुत्य उपक्रम-प्रभाकर सावंत• *इयत्ता १० वी व १२ वीच्या फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षांच्या आवेदनपत्रांना मुदतवाढ• आ. प्रसाद लाड, स्वप्निल फाटक यांना समाजाची संस्था कदापी बळकावु देणार नाही• ग्रामीण रस्त्यांवरील झाडी - झुडपांमुळे वाहनचालक, पादचारी हैराण• बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणारे शैक्षणिक थेट आर्थिक लाभ रद्द करून, मूलभूत वस्तू संच देण्याच्या निर्णयाला बांधकाम कामगार महासंघाचा तीव्र विरोध-जिल्हा सचिव हेमंतकुमार परब• अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची बदली

*इयत्ता १० वी व १२ वीच्या फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षांच्या आवेदनपत्रांना मुदतवाढ

📅 १ नोव्हेंबर, २०२६👁 ८ब्रेकिंग
*इयत्ता १० वी व १२ वीच्या फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षांच्या आवेदनपत्रांना मुदतवाढ

*कोंकण एक्सप्रेस

*इयत्ता १० वी व १२ वीच्या फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षांच्या आवेदनपत्रांना मुदतवाढ

*सिंधुदुर्गनगरी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षांच्या आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत तसेच तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी आणि ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत Transfer of Credit घेणारे) विद्यार्थ्यांना नियमित शुल्काने आवेदनपत्रे सादर करता येणार आहेत.

विद्यार्थ्यांना रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ ते सोमवार, दि. ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्रे भरता येतील. माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विहित पद्धतीने शुल्क भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२६ असून, शुल्क पावती व विद्यार्थ्यांची प्रिलिस्ट संबंधित विभागीय मंडळाकडे सोमवार, दि. ७ डिसेंबर २०२६ पर्यंत जमा करणे आवश्यक आहे.

आवेदनपत्रे भरण्यापूर्वी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी College/School Profile मध्ये संस्था, मान्यताप्राप्त विषय आणि शिक्षक यांच्याबाबतची माहिती अचूक भरून मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन सादर केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या Pre-List ची प्रिंट काढून त्यातील माहिती विद्यार्थ्यांच्या जनरल रजिस्टरनुसार पडताळावी. माहिती अचूक असल्याची खात्री करून संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. तसेच शाळाप्रमुख किंवा प्राचार्य यांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे.

इयत्ता १० वी व १२ वीच्या फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने भरण्याबाबतच्या सविस्तर सूचना यापूर्वीच विभागीय मंडळांमार्फत सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, दुष्काळी परिस्थितीची पार्श्वभूमी लक्षात घेता यंदा विलंब शुल्क व अतिविलंब शुल्क न आकारता सर्व आवेदनपत्रे नियमित शुल्काने स्वीकारण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. मात्र, आवेदनपत्रे सादर करण्यासाठी देण्यात आलेली ही मुदतवाढ अंतिम असून, त्यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थी, पालक, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विहित मुदतीत आवेदनपत्रे सादर करावीत.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या

अधिक पहा →