बुधवार, ४ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• चिपळूण येथे सामाजिक कार्यकर्ते अनुराग उतेकर यांच्यासह शेकडो युवक-युवती व ग्रामस्थांचा भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश• भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी मागणी• अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, गोततर्फे सावंतवाडीत उद्या भव्य मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर• चिपळुणात भाजपची ‘राष्ट्रचिंतन बैठक’• नैसर्गिक आपत्तीग्रस्त मच्छीमारांना केंद्र सरकारचा दिलासा!• सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी जनतेच्या आरोग्यसेवेचा प्रश्न ऐरणीवर!• कोकण रेल्वे स्थानकांवरील एक्सप्रेस थांब्यासाठी आमदार प्रमोद जठारांची रेल्वे च्या COM यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा• माजी सैनिकाच्या पाल्याला परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी• भाजप बूथ अध्यक्ष आनंद शिंदे यांचे निधन-पालकमंत्री नितेश राणे यांनी शिंदे कुटुंबीयांची भेट घेत केले सांत्वन• सिंधुदुर्ग ते नवी मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार; आठवड्याचे सर्व ७ दिवस धावणार विमान• चिपळूण येथे सामाजिक कार्यकर्ते अनुराग उतेकर यांच्यासह शेकडो युवक-युवती व ग्रामस्थांचा भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश• भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी मागणी• अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, गोततर्फे सावंतवाडीत उद्या भव्य मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर• चिपळुणात भाजपची ‘राष्ट्रचिंतन बैठक’• नैसर्गिक आपत्तीग्रस्त मच्छीमारांना केंद्र सरकारचा दिलासा!• सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी जनतेच्या आरोग्यसेवेचा प्रश्न ऐरणीवर!• कोकण रेल्वे स्थानकांवरील एक्सप्रेस थांब्यासाठी आमदार प्रमोद जठारांची रेल्वे च्या COM यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा• माजी सैनिकाच्या पाल्याला परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी• भाजप बूथ अध्यक्ष आनंद शिंदे यांचे निधन-पालकमंत्री नितेश राणे यांनी शिंदे कुटुंबीयांची भेट घेत केले सांत्वन• सिंधुदुर्ग ते नवी मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार; आठवड्याचे सर्व ७ दिवस धावणार विमान

नैसर्गिक आपत्तीग्रस्त मच्छीमारांना केंद्र सरकारचा दिलासा!

📅 ४ नोव्हेंबर, २०२६👁 ४ब्रेकिंग
नैसर्गिक आपत्तीग्रस्त मच्छीमारांना केंद्र सरकारचा दिलासा!

*कोंकण एक्सप्रेस

*नैसर्गिक आपत्तीग्रस्त मच्छीमारांना केंद्र सरकारचा दिलासा!

*बोटी व जाळ्यांच्या नुकसानीसाठी आर्थिक मदत वाढवली

*सिंधुदुर्गनगरी

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या (NDRF) सुधारित निकषांमध्ये मत्स्यव्यवसायाचा समावेश; २०२६ ते २०३१ या कालावधीत लागू राहणार नवे निकष

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या मच्छीमारांना आणि मत्स्यव्यवसायाशी संबंधित शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) अंतर्गत मदतीच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यात आली असून, २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी हे सुधारित निकष लागू राहणार आहेत. या निर्णयामुळे राज्यातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त मच्छीमार, लहान व सीमांत शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

मत्स्यव्यवसायासाठी सुधारित आर्थिक मदतीचे निकष पुढीलप्रमाणे :

अंशतः नुकसान झालेल्या मासेमारी बोटींच्या दुरुस्तीसाठी : प्रति बोट ८,००० रुपये आर्थिक मदत.

अंशतः नुकसान झालेल्या मासेमारी जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी : प्रति जाळे ४,००० रुपये मदत.

पूर्णतः नुकसान झालेल्या मासेमारी बोटींच्या पुनर्स्थापनेसाठी : प्रति बोट १९,००० रुपये मदत.

पूर्णतः नुकसान झालेल्या मासेमारी जाळ्यांच्या पुनर्स्थापनेसाठी : प्रति जाळे ५,१०० रुपये मदत.

मत्स्यबीज फार्मसाठी : लहान व सीमांत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १३,००० रुपये इनपुट सबसिडी.

या मदतीसाठी काही पात्रता अटीही निश्चित करण्यात आल्या आहेत. संबंधित नुकसानीसाठी अन्य शासकीय योजनेंतर्गत मदत घेतलेली असल्यास त्याच नुकसानीसाठी पुन्हा मदत मिळणार नाही. तसेच विमा संरक्षणातून मिळालेली रक्कम असल्यास ती आर्थिक मदतीत समायोजित केली जाणार आहे.

केंद्र सरकारच्या या सुधारित निकषांमुळे नैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसान सहन करणाऱ्या मच्छीमारांना बोटी व जाळ्यांच्या दुरुस्ती आणि पुनर्स्थापनेसाठी आर्थिक आधार मिळणार असून, मत्स्यव्यवसायाचे नुकसान भरून काढण्यास मदत होणार आहे.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या

अधिक पहा →