अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, गोततर्फे सावंतवाडीत उद्या भव्य मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर

*कोंकण एक्सप्रेस
*अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, गोततर्फे सावंतवाडीत उद्या भव्य मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर
*'एक्सटेंशन ओपीडी'चाही होणार शुभारंभ!
*सावंतवाडी : प्रतिनिधी
अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (AIIA), गोवा (आयुष मंत्रालय, भारत सरकार) यांच्या एनएसएस युनिटतर्फे सावंतवाडी येथे एका विशेष 'एक्सटेंशन ओपीडी'चा (Extension OPD) शुभारंभ करण्यात येत आहे. या सुवर्णमहोत्सवी व महत्त्वाच्या प्रसंगाचे औचित्य साधून उद्या, ५ नोव्हेंबर २०२६ (गुरुवार) रोजी सकाळी ९:३० ते दुपारी २:०० या वेळेत पहिले मजला, भाजी मंडई इमारत, सावंतवाडी येथे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्थेचे संचालक प्रा. (वैद्य) पी. के. प्रजापती यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा आणि शिबिर संपन्न होणार असून, डॉ. प्रशांत सासाणे (सहाय्यक प्राध्यापक, कायचिकित्सा) हे या शिबिराचे समन्वयक म्हणून पाहणी व पाहट पाहणार आहेत.
तज्ज्ञ डॉक्टरांची विशेष सेवा
सावंतवाडी व परिसरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा व आयुर्वेद उपचाराचा लाभ मिळावा, यासाठी खालील वैद्यकीय व प्रशासकीय अधिकारी/कर्मचारी उपस्थित राहून सेवा देणार आहेत:
डॉ. स्वाती गायकवाड (सहयोगी प्राध्यापक, पीटीएसआर)
डॉ. प्रशांत सासाणे (सहाय्यक प्राध्यापक, कायचिकित्सा)
डॉ. दीपक ए. एस. (सहाय्यक प्राध्यापक, शल्य)
डॉ. दत्ताप्रसाद पवार (वैद्यकीय अधिकारी)
स्टाफ नर्स: मिस पूजा झोळंबेकर, श्री. स्वप्नील खवडकर
फार्मासिस्ट: दर्शन सावंत
MTS: श्री. सुमित हळदणकर, संकेत साळगावकर
चालक / MTS: श्री. सागर धुरी
या मोफत वैद्यकीय शिबिराचा व नूतन एक्सटेंशन ओपीडीचा लाभ सावंतवाडी परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, गोवा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जाहिरातसावंतवाडी मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगभटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी मागणी
ब्रेकिंगसिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी जनतेच्या आरोग्यसेवेचा प्रश्न ऐरणीवर!
ब्रेकिंगबॉडी बिल्डिंगच्या मैदानात युवा नेते विशाल परब यांच्या वक्तृत्वाची तुफानी बॅटिंग!
ब्रेकिंग