बुधवार, ४ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• चिपळूण येथे सामाजिक कार्यकर्ते अनुराग उतेकर यांच्यासह शेकडो युवक-युवती व ग्रामस्थांचा भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश• भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी मागणी• अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, गोततर्फे सावंतवाडीत उद्या भव्य मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर• चिपळुणात भाजपची ‘राष्ट्रचिंतन बैठक’• नैसर्गिक आपत्तीग्रस्त मच्छीमारांना केंद्र सरकारचा दिलासा!• सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी जनतेच्या आरोग्यसेवेचा प्रश्न ऐरणीवर!• कोकण रेल्वे स्थानकांवरील एक्सप्रेस थांब्यासाठी आमदार प्रमोद जठारांची रेल्वे च्या COM यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा• माजी सैनिकाच्या पाल्याला परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी• भाजप बूथ अध्यक्ष आनंद शिंदे यांचे निधन-पालकमंत्री नितेश राणे यांनी शिंदे कुटुंबीयांची भेट घेत केले सांत्वन• सिंधुदुर्ग ते नवी मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार; आठवड्याचे सर्व ७ दिवस धावणार विमान• चिपळूण येथे सामाजिक कार्यकर्ते अनुराग उतेकर यांच्यासह शेकडो युवक-युवती व ग्रामस्थांचा भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश• भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी मागणी• अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, गोततर्फे सावंतवाडीत उद्या भव्य मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर• चिपळुणात भाजपची ‘राष्ट्रचिंतन बैठक’• नैसर्गिक आपत्तीग्रस्त मच्छीमारांना केंद्र सरकारचा दिलासा!• सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी जनतेच्या आरोग्यसेवेचा प्रश्न ऐरणीवर!• कोकण रेल्वे स्थानकांवरील एक्सप्रेस थांब्यासाठी आमदार प्रमोद जठारांची रेल्वे च्या COM यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा• माजी सैनिकाच्या पाल्याला परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी• भाजप बूथ अध्यक्ष आनंद शिंदे यांचे निधन-पालकमंत्री नितेश राणे यांनी शिंदे कुटुंबीयांची भेट घेत केले सांत्वन• सिंधुदुर्ग ते नवी मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार; आठवड्याचे सर्व ७ दिवस धावणार विमान

चिपळुणात भाजपची ‘राष्ट्रचिंतन बैठक’

📅 ४ नोव्हेंबर, २०२६👁 २ब्रेकिंग
चिपळुणात भाजपची ‘राष्ट्रचिंतन बैठक’

*कोंकण एक्सप्रेस

*चिपळुणात भाजपची ‘राष्ट्रचिंतन बैठक’; ‘

*लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अभियानाला पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा प्रतिसाद

*आमदार प्रमोद जठार यांची प्रमुख उपस्थिती

*चिपळूण

भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अभियानांतर्गत भाजप रत्नागिरी दक्षिण जिल्ह्याची राष्ट्रचिंतन बैठक मंगळवारी (३ नोव्हेंबर) सायंकाळी चिपळुणातील शिक्षक पतपेढी सभागृहात पार पडली. जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य तथा भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार प्रमोद जठार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

संपूर्ण वंदे मातरम् आणि महाराष्ट्र गीताने बैठकीची सुरुवात झाली. यावेळी भाजप रत्नागिरी दक्षिण जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते आमदार प्रमोद जठार यांचा सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविकातून प्रशांत यादव यांनी राष्ट्रचिंतन बैठकीचा उद्देश स्पष्ट करत पक्षसंघटन अधिक मजबूत करण्याबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आगामी काळात बूथस्तरापासून पक्षसंघटना अधिक सक्षम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आमदार प्रमोद जठार यांनी ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अभियानाचे महत्त्व स्पष्ट केले. भाजपची ध्येय-धोरणे, भूमिका आणि विविध उपक्रम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रभावीपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीदरम्यान SIRच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांकडून प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या शेवटी नवनिर्वाचित चिपळूण शहर मंडळ अध्यक्ष आशिष खातू तसेच चिपळूण शहर महिला मोर्चा अध्यक्ष रुही खेडेकर यांचा आमदार प्रमोद जठार व जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

बैठकीला रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

रत्नागिरी मधील अधिक बातम्या

अधिक पहा →