मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• कोकण रेल्वे स्थानकांवरील एक्सप्रेस थांब्यासाठी आमदार प्रमोद जठारांची रेल्वे च्या COM यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा• माजी सैनिकाच्या पाल्याला परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी• भाजप बूथ अध्यक्ष आनंद शिंदे यांचे निधन-पालकमंत्री नितेश राणे यांनी शिंदे कुटुंबीयांची भेट घेत केले सांत्वन• सिंधुदुर्ग ते नवी मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार; आठवड्याचे सर्व ७ दिवस धावणार विमान• सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ नोव्हेंबर ऐवजी ९ नोव्हेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर• लांजा तालुक्यातील आसगे-तळेराई-गवळीवाडी-शिंदेवाडी रस्ता कामाचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते भूमिपूजन• स्थानिक बाजारपेठेला ताकद देणारा दिवाळी बाजार जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना देईल-पालकमंत्री नितेश राणे• *घुसखोरीला थारा नको; लोकशाहीला धोका नको!• ४९ वी नाथ पै एकांकिका स्पर्धा २४ डिसेंबरपासून कणकवलीत रंगणार!• पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी केलेल्या उपोषणात मा.आ. वैभव नाईक,परशुराम उपरकर झाले सहभागी• कोकण रेल्वे स्थानकांवरील एक्सप्रेस थांब्यासाठी आमदार प्रमोद जठारांची रेल्वे च्या COM यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा• माजी सैनिकाच्या पाल्याला परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी• भाजप बूथ अध्यक्ष आनंद शिंदे यांचे निधन-पालकमंत्री नितेश राणे यांनी शिंदे कुटुंबीयांची भेट घेत केले सांत्वन• सिंधुदुर्ग ते नवी मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार; आठवड्याचे सर्व ७ दिवस धावणार विमान• सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ नोव्हेंबर ऐवजी ९ नोव्हेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर• लांजा तालुक्यातील आसगे-तळेराई-गवळीवाडी-शिंदेवाडी रस्ता कामाचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते भूमिपूजन• स्थानिक बाजारपेठेला ताकद देणारा दिवाळी बाजार जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना देईल-पालकमंत्री नितेश राणे• *घुसखोरीला थारा नको; लोकशाहीला धोका नको!• ४९ वी नाथ पै एकांकिका स्पर्धा २४ डिसेंबरपासून कणकवलीत रंगणार!• पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी केलेल्या उपोषणात मा.आ. वैभव नाईक,परशुराम उपरकर झाले सहभागी

माजी सैनिकाच्या पाल्याला परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी

📅 ३ नोव्हेंबर, २०२६👁 २ब्रेकिंग
माजी सैनिकाच्या पाल्याला परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी

*कोंकण एक्सप्रेस

*माजी सैनिकाच्या पाल्याला परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी

*एक लाख रुपयांची आर्थिक मदत

*सिंधुदुर्गनगरी

माजी सैनिकांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या कल्याणकारी निधी योजनेतून माजी सैनिकाच्या पाल्याला परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

माजी सैनिक संतोष मेघश्याम सावंत, रा. सबनीसवाडा, ता. सावंतवाडी यांचे पाल्य स्वप्नील सावंत हा शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये रशियातील Kemerovo State University, Kemerovo येथे एमबीबीएसच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. त्याच्या परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या कल्याणकारी निधी योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या एक लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या हस्ते माजी सैनिक संतोष सावंत यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे प्रभारी सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लक्ष्मण कोळी तसेच कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

सैनिक कल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील शहीदांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, अपंग माजी सैनिक तसेच त्यांचे अनाथ पाल्य व अवलंबित यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांच्या माध्यमातून शैक्षणिक मदत, स्वयंरोजगार आणि पुनर्वसनासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते.

जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे दूरध्वनी क्रमांक 02362-228820 वर संपर्क साधावा.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या

अधिक पहा →