शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• नाईक ट्रॅव्हल्स (NAIK TRAVELS)• कणकवलीत १ नोव्हेंबर रोजी पाककला प्रशिक्षण, स्पर्धा• गोपुरीतील चिकूच्या बागेतील व्यासपीठाला माधवराव गाडगीळ यांचे नाव• सुनील चव्हाण यांचे निधन• इयत्ता 4 थी आणि 7 वीची शिष्यवृत्ती परीक्षा 21 फेब्रुवारी 2027 रोजी• नानिवडे-वाडेकरवाडी प्रकल्पाचा 16 वर्षांचा वनवास संपला• मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे ३० ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर• सावंतवाडी पाणी पुरवठा घोटाळा: जिल्हाधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष का?• घनकचरा व्यवस्थापन नियमांची प्रभावी अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे• कणकवलीत शनिवार पासून अंडरआर्म स्पर्धा• नाईक ट्रॅव्हल्स (NAIK TRAVELS)• कणकवलीत १ नोव्हेंबर रोजी पाककला प्रशिक्षण, स्पर्धा• गोपुरीतील चिकूच्या बागेतील व्यासपीठाला माधवराव गाडगीळ यांचे नाव• सुनील चव्हाण यांचे निधन• इयत्ता 4 थी आणि 7 वीची शिष्यवृत्ती परीक्षा 21 फेब्रुवारी 2027 रोजी• नानिवडे-वाडेकरवाडी प्रकल्पाचा 16 वर्षांचा वनवास संपला• मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे ३० ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर• सावंतवाडी पाणी पुरवठा घोटाळा: जिल्हाधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष का?• घनकचरा व्यवस्थापन नियमांची प्रभावी अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे• कणकवलीत शनिवार पासून अंडरआर्म स्पर्धा

सावंतवाडी पाणी पुरवठा घोटाळा: जिल्हाधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष का?

📅 ३० ऑक्टोबर, २०२६👁 २ब्रेकिंग
सावंतवाडी पाणी पुरवठा घोटाळा: जिल्हाधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष का?

*कोंकण एक्सप्रेस

*सावंतवाडी पाणी पुरवठा घोटाळा: जिल्हाधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष का?

*देव्या सुर्याजी यांचा आंदोलनाचा इशारा;

*​प्रशासन भ्रष्टाचाराला खतपाणी घालतंय का?

*सावंतवाडी : प्रतिनिधि

पाणी पुरवठा विभागात झालेल्या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन देखील दुर्लक्ष का होत आहे ? प्रशासन भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहे का ? असा सवाल नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी केला आहे. तसेच रजिस्टर गहाळ प्रकरणी मुख्याधिकारी, पंप चालक यांना ताब्यात घेऊन चौकशी करावी अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली असून या प्रकरणाची जिल्हाधिकारी यांच्याकडून उच्चस्तरीय चौकशी न लागल्यास शहरवासीयांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा श्री. सुर्याजी यांनी दिला आहे.

सावंतवाडी नगरपरिषद पाणी पुरवठा विभागातील गैरव्यवहार ,भ्रष्टाचाराबाबत सर्व पुरावे समोर असताना, रजिस्टर गहाळ असताना उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई होणे गरजेचे होते. मात्र, असं असतानाही या गैरव्यवहारमध्ये जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झालेली नाही. शिवसेना सर्व नगरसेवक व नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांनी जिल्हाधिकारी यांच लक्ष वेधून देखील याकडे दुर्लक्ष केला जात आहे.‌ त्यामुळे या भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून होत आहे का ? असा सवाल नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी केला आहे. तसेच रजिस्टर गहाळ प्रकरणी केवळ जोडारी यांची चौकशी करून न थांबता अहवालावर सही करणारे जबाबदार पंपचालक, विभाग प्रमुख, प्रशासकीय अधिकारी अन् मुख्याधिकारी यांना ताब्यात घेऊन चौकशी करावी अशी मागणी पोलीसांकडे केली आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई न झाल्यास शहारातील नागरिकांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा श्री.‌ सुर्याजी यांनी दिला आहे.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सावंतवाडी मधील अधिक बातम्या

अधिक पहा →