सोमवार, २ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याच्या गुन्ह्यातून आरोपीची ससन्मान निर्दोष मुक्तता -अॅड. अशपाक शेख यांच्या युक्तिवादाला यश• बॉडी बिल्डिंगच्या मैदानात युवा नेते विशाल परब यांच्या वक्तृत्वाची तुफानी बॅटिंग!• जानेवारीत सिंपन चषक २०२७ क्रिकेट स्पर्धा• आ. प्रसाद लाड, स्वप्निल फाटक यांना समाजाची संस्था कदापी बळकावु देणार नाही• महिलांसाठी व्यावसायीक व्यासपिठ हा स्तुत्य उपक्रम-प्रभाकर सावंत• *इयत्ता १० वी व १२ वीच्या फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षांच्या आवेदनपत्रांना मुदतवाढ• आ. प्रसाद लाड, स्वप्निल फाटक यांना समाजाची संस्था कदापी बळकावु देणार नाही• ग्रामीण रस्त्यांवरील झाडी - झुडपांमुळे वाहनचालक, पादचारी हैराण• बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणारे शैक्षणिक थेट आर्थिक लाभ रद्द करून, मूलभूत वस्तू संच देण्याच्या निर्णयाला बांधकाम कामगार महासंघाचा तीव्र विरोध-जिल्हा सचिव हेमंतकुमार परब• अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची बदली• अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याच्या गुन्ह्यातून आरोपीची ससन्मान निर्दोष मुक्तता -अॅड. अशपाक शेख यांच्या युक्तिवादाला यश• बॉडी बिल्डिंगच्या मैदानात युवा नेते विशाल परब यांच्या वक्तृत्वाची तुफानी बॅटिंग!• जानेवारीत सिंपन चषक २०२७ क्रिकेट स्पर्धा• आ. प्रसाद लाड, स्वप्निल फाटक यांना समाजाची संस्था कदापी बळकावु देणार नाही• महिलांसाठी व्यावसायीक व्यासपिठ हा स्तुत्य उपक्रम-प्रभाकर सावंत• *इयत्ता १० वी व १२ वीच्या फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षांच्या आवेदनपत्रांना मुदतवाढ• आ. प्रसाद लाड, स्वप्निल फाटक यांना समाजाची संस्था कदापी बळकावु देणार नाही• ग्रामीण रस्त्यांवरील झाडी - झुडपांमुळे वाहनचालक, पादचारी हैराण• बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणारे शैक्षणिक थेट आर्थिक लाभ रद्द करून, मूलभूत वस्तू संच देण्याच्या निर्णयाला बांधकाम कामगार महासंघाचा तीव्र विरोध-जिल्हा सचिव हेमंतकुमार परब• अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची बदली

जानेवारीत सिंपन चषक २०२७ क्रिकेट स्पर्धा

📅 २ नोव्हेंबर, २०२६👁 ४ब्रेकिंग#CRIKCET
जानेवारीत सिंपन चषक २०२७ क्रिकेट स्पर्धा

*कोंकण एक्सप्रेस

*जानेवारीत सिंपन चषक २०२७ क्रिकेट स्पर्धा

*सिंपन प्रतिष्ठानतर्फे आयोजन; प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल तांबे यांची माहिती

*कणकवली : संजना हळदिवे

सिंपन प्रतिष्ठान, मुंबई (रजि.) यांच्या वतीने सिंधुदुर्गतर्फे ‘सिंपन चषक २०२७’ या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन २० ते २४ जानेवारी २०२७ या कालावधीत मालवण येथील टोपीवाला बोर्डिंग ग्राऊंडवर केले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन २४ रोजी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत होईल. स्पर्धेचे बक्षीस वितरण पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत होईल. जिल्ह््यातील उदयोन्मुख खेळाडूंना वाव मिळून देणे हा स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे, अशी माहिती सिंपन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल तांबे यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. तांबे बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी बाळकृष्ण जाधव, बी. एस. कदम, दत्ता पवार, सत्यविजय तांबे, राजेश कदम, कौस्तुभ तांबे, युवराज कदम उपस्थित होते.

श्री. तांबे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा पिढीच्या क्रीडा गुणांना वाव आणि प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खेळ, जिद्द, संघर्ष आणि विजय या मूल्यांची सांगड घालत जिल्ह्यातील जेन-जी आणि जेन-अल्फा पिढीला एकत्र आणण्याचाही स्पर्धेमागील उद्देश आहे. क्रिकेट स्पर्धेचे प्रथम पारितोषिक १ लाख रुपये, द्वितीय पारितोषिक ५० हजार रुपये, तर तृतीय व चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी १५ हजार रुपये अशी बक्षिसे आहेत. याशिवाय मालिकावीर, सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाल अशी वैयक्तिक स्वरुपातील बक्षिसे आहेत.

सिंपन प्रतिष्ठान ही संस्था गेली अनेक वर्षे मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक तसेच विविध क्षेत्रांत अविरतपणे कार्यरत आहे. कणकवली तालुक्यातील जानवली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे भव्य स्मारक शिल्प, संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा संस्थेचा संकल्प आहे. या ठिकाणी शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांसह वैद्यकीय सुविधा, व्यवसाय मार्गदर्शन, महिला सबलीकरण, कला व क्रीडा अशा विविध क्षेत्रांत भरीव कार्य करण्याचा प्रतिष्ठानचा मानस आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवोदित क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रतिष्ठानचा हा प्रयत्न आहे, असे श्री. तांबे यांनी सांगितले.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →