सोमवार, २ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याच्या गुन्ह्यातून आरोपीची ससन्मान निर्दोष मुक्तता -अॅड. अशपाक शेख यांच्या युक्तिवादाला यश• बॉडी बिल्डिंगच्या मैदानात युवा नेते विशाल परब यांच्या वक्तृत्वाची तुफानी बॅटिंग!• जानेवारीत सिंपन चषक २०२७ क्रिकेट स्पर्धा• आ. प्रसाद लाड, स्वप्निल फाटक यांना समाजाची संस्था कदापी बळकावु देणार नाही• महिलांसाठी व्यावसायीक व्यासपिठ हा स्तुत्य उपक्रम-प्रभाकर सावंत• *इयत्ता १० वी व १२ वीच्या फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षांच्या आवेदनपत्रांना मुदतवाढ• आ. प्रसाद लाड, स्वप्निल फाटक यांना समाजाची संस्था कदापी बळकावु देणार नाही• ग्रामीण रस्त्यांवरील झाडी - झुडपांमुळे वाहनचालक, पादचारी हैराण• बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणारे शैक्षणिक थेट आर्थिक लाभ रद्द करून, मूलभूत वस्तू संच देण्याच्या निर्णयाला बांधकाम कामगार महासंघाचा तीव्र विरोध-जिल्हा सचिव हेमंतकुमार परब• अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची बदली• अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याच्या गुन्ह्यातून आरोपीची ससन्मान निर्दोष मुक्तता -अॅड. अशपाक शेख यांच्या युक्तिवादाला यश• बॉडी बिल्डिंगच्या मैदानात युवा नेते विशाल परब यांच्या वक्तृत्वाची तुफानी बॅटिंग!• जानेवारीत सिंपन चषक २०२७ क्रिकेट स्पर्धा• आ. प्रसाद लाड, स्वप्निल फाटक यांना समाजाची संस्था कदापी बळकावु देणार नाही• महिलांसाठी व्यावसायीक व्यासपिठ हा स्तुत्य उपक्रम-प्रभाकर सावंत• *इयत्ता १० वी व १२ वीच्या फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षांच्या आवेदनपत्रांना मुदतवाढ• आ. प्रसाद लाड, स्वप्निल फाटक यांना समाजाची संस्था कदापी बळकावु देणार नाही• ग्रामीण रस्त्यांवरील झाडी - झुडपांमुळे वाहनचालक, पादचारी हैराण• बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणारे शैक्षणिक थेट आर्थिक लाभ रद्द करून, मूलभूत वस्तू संच देण्याच्या निर्णयाला बांधकाम कामगार महासंघाचा तीव्र विरोध-जिल्हा सचिव हेमंतकुमार परब• अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची बदली

ग्रामीण रस्त्यांवरील झाडी - झुडपांमुळे वाहनचालक, पादचारी हैराण

📅 १ नोव्हेंबर, २०२६👁 ६ब्रेकिंग
ग्रामीण रस्त्यांवरील झाडी - झुडपांमुळे वाहनचालक, पादचारी हैराण

*कोंकण एक्सप्रेस

*ग्रामीण रस्त्यांवरील झाडी - झुडपांमुळे वाहनचालक, पादचारी हैराण

*रस्त्याच्या साईडपट्टीवरील वाढलेले गवत साफ करण्याची मागणी

*कणकवली : प्रतिनिधि

ग्रामीण भागातील रस्त्यांच्या बाजूला वाढलेल्या झाडी - झुडपांमुळे वाहनचालक आणि पादचारी हैराण झाले आहेत. रस्त्याच्या साईडपट्टीवर वाढलेले प्रचंड गवत रस्त्यावर येत असल्याने वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत आणि झाडी-झुडपे साफ करावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

गणेशोत्सवाच्या काळात ग्रामीण भागातील रस्त्यांच्या बाजूची झाडी तोडण्याचे काम करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा वाढलेल्या गवतामुळे अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला अडथळे निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी गवत थेट रस्त्यावर येत असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेणे, बाजू देणे कठीण होत आहे. ग्रामीण भागातील बऱ्याच रस्त्यावरून शालेय मुलं ये- जा करत असतात. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील अरुंद रस्त्यांवरून प्रवास करताना वाहनचालकांना विशेष काळजी घ्यावी लागत असून, पादचाऱ्यांनाही सुरक्षितपणे चालणे अवघड झाले आहे.

संभाव्य अपघात टाळण्यासाठी रस्त्याच्या साईडपट्ट्या मोकळ्या असणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायती, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच रस्त्यांच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या प्रशासनाने तातडीने रस्त्यांच्या बाजूला वाढलेले गवत आणि झाडी - झुडपे साफ करावीत. ग्रामीण भागातील रस्त्यांची नियमित साफसफाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आ

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →