सोमवार, २ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• *'Konkan Express' च्या दणक्यामुळे बांधकाम विभागाला खडबडून जाग; साईडपट्टीलाही केला भराव*• अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याच्या गुन्ह्यातून आरोपीची ससन्मान निर्दोष मुक्तता -अॅड. अशपाक शेख यांच्या युक्तिवादाला यश• बॉडी बिल्डिंगच्या मैदानात युवा नेते विशाल परब यांच्या वक्तृत्वाची तुफानी बॅटिंग!• जानेवारीत सिंपन चषक २०२७ क्रिकेट स्पर्धा• आ. प्रसाद लाड, स्वप्निल फाटक यांना समाजाची संस्था कदापी बळकावु देणार नाही• महिलांसाठी व्यावसायीक व्यासपिठ हा स्तुत्य उपक्रम-प्रभाकर सावंत• *इयत्ता १० वी व १२ वीच्या फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षांच्या आवेदनपत्रांना मुदतवाढ• आ. प्रसाद लाड, स्वप्निल फाटक यांना समाजाची संस्था कदापी बळकावु देणार नाही• ग्रामीण रस्त्यांवरील झाडी - झुडपांमुळे वाहनचालक, पादचारी हैराण• बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणारे शैक्षणिक थेट आर्थिक लाभ रद्द करून, मूलभूत वस्तू संच देण्याच्या निर्णयाला बांधकाम कामगार महासंघाचा तीव्र विरोध-जिल्हा सचिव हेमंतकुमार परब• *'Konkan Express' च्या दणक्यामुळे बांधकाम विभागाला खडबडून जाग; साईडपट्टीलाही केला भराव*• अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याच्या गुन्ह्यातून आरोपीची ससन्मान निर्दोष मुक्तता -अॅड. अशपाक शेख यांच्या युक्तिवादाला यश• बॉडी बिल्डिंगच्या मैदानात युवा नेते विशाल परब यांच्या वक्तृत्वाची तुफानी बॅटिंग!• जानेवारीत सिंपन चषक २०२७ क्रिकेट स्पर्धा• आ. प्रसाद लाड, स्वप्निल फाटक यांना समाजाची संस्था कदापी बळकावु देणार नाही• महिलांसाठी व्यावसायीक व्यासपिठ हा स्तुत्य उपक्रम-प्रभाकर सावंत• *इयत्ता १० वी व १२ वीच्या फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षांच्या आवेदनपत्रांना मुदतवाढ• आ. प्रसाद लाड, स्वप्निल फाटक यांना समाजाची संस्था कदापी बळकावु देणार नाही• ग्रामीण रस्त्यांवरील झाडी - झुडपांमुळे वाहनचालक, पादचारी हैराण• बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणारे शैक्षणिक थेट आर्थिक लाभ रद्द करून, मूलभूत वस्तू संच देण्याच्या निर्णयाला बांधकाम कामगार महासंघाचा तीव्र विरोध-जिल्हा सचिव हेमंतकुमार परब

तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलचेचं वर्चस्व

📅 ३१ ऑक्टोबर, २०२६👁 ८ब्रेकिंग
तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलचेचं वर्चस्व

*कोंकण एक्सप्रेस

*तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलचेचं वर्चस्व

*कणकवली तालुकास्तरीय शालेय कॅरम चॅम्पियनशीप पुन्हा एकदा कनेडी हायस्कूलकडेच

*कणकवली : संजना हळदिवे

कणकवली तालुकास्तरीय शालेय कॅरम स्पर्धा सन २०२६ नुकतीच कनेडी हायस्कूल येथे संपन्न झाली. या स्पर्धेवर कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. काॅलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स‌‌‌, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स व बालमंदिर कनेडी या प्रशालेने दरवर्षी प्रमाणे आपले वर्चस्व राखले व पुन्हा एकदा चॅम्पियनशीप स्वतःकडेच राखली. सदर स्पर्धेमध्ये तालुक्यातील एकूण २२० पेक्षा जास्त कॅरम खेळाडूंनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेमध्ये प्रशालेतील यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणे -

१४ वर्षाखालील मुली -

मीरा मकरंद आपटे इ. ८वी (प्रथम क्रमांक)

१४ वर्षांखालील मुले

गंधर्व जनार्दन जाधव इ. ७वी (तृतीय क्रमांक)

१७ वर्षाखालील मुली-

कु. मुक्ती अमृत भातकांडे इ. १०वी (प्रथम क्रमांक), कु. दिव्या नंदकिशोर चव्हाण इ. १०वी (तृतीय क्रमांक), कु. प्रांजल तुळशीदास नेटके इ. ९वी (तृतीय क्रमांक)

१९ वर्षाखालील मुली-

कु. श्रेया राजेंद्र महाडीक इ. १२वी (प्रथम क्रमांक), कु. लक्ष्मी भिमा जाधव इ. १२वी ( द्वितीय क्रमांक), कु. दिशा गणपत पवार इ. १२वी (तृतीय क्रमांक), कु. ऋतुजा दिपक पेडणेकर इ. १२वी (तृतीय क्रमांक)

१९ वर्षाखालील मुले -

सम्यक सुनिल कांबळे इ. १२वी (द्वितीय क्रमांक), जयदीप अर्जुन कदम इ. १२वी (तृतीय क्रमांक), अभिषेक संतोष माने इ. १२वी (तृतीय क्रमांक)

वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्गनगरी येथे होणार असलेल्या जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन क. ग. शि. प्र. मंडळ, मुंबईचे संचालक सन्मा. श्री. जयप्रकाश सावंत, खजिनदार सन्मा. श्री. प्रकाश सावंत, माध्यमिक विद्यामंदिर कनेडीचे शालेय समिती चेअरमन सन्मा. श्री. आर्. एच्. सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून प्रशालेचे संस्कृत अध्यापक श्री. मकरंद आपटे व तालुका कॅरम असोसिएशनचे पदाधिकारी व प्रसिद्ध कॅरम खेळाडू श्री. गौतम यादव यांनी काम पाहिले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे क.ग‌.शि.प्र. मंडळ मुंबईचे अध्यक्ष सन्मा. श्री‌. सतीश सावंत व सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन सन्मा. श्री. आर्. एच्. सावंत व सर्व सदस्य, प्रशाला मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक श्री. बयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेतील संस्कृत व इंग्रजी शिक्षक तसेच कॅरम पंच श्री. मकरंद आपटे, जिल्ह्यातील प्रसिद्ध खेळाडू श्री. गौतम यादव आणि क्रीडा शिक्षक श्री. बयाजी बुराण यांचे मार्गदर्शन लाभले.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →