सोमवार, २ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याच्या गुन्ह्यातून आरोपीची ससन्मान निर्दोष मुक्तता -अॅड. अशपाक शेख यांच्या युक्तिवादाला यश• बॉडी बिल्डिंगच्या मैदानात युवा नेते विशाल परब यांच्या वक्तृत्वाची तुफानी बॅटिंग!• जानेवारीत सिंपन चषक २०२७ क्रिकेट स्पर्धा• आ. प्रसाद लाड, स्वप्निल फाटक यांना समाजाची संस्था कदापी बळकावु देणार नाही• महिलांसाठी व्यावसायीक व्यासपिठ हा स्तुत्य उपक्रम-प्रभाकर सावंत• *इयत्ता १० वी व १२ वीच्या फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षांच्या आवेदनपत्रांना मुदतवाढ• आ. प्रसाद लाड, स्वप्निल फाटक यांना समाजाची संस्था कदापी बळकावु देणार नाही• ग्रामीण रस्त्यांवरील झाडी - झुडपांमुळे वाहनचालक, पादचारी हैराण• बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणारे शैक्षणिक थेट आर्थिक लाभ रद्द करून, मूलभूत वस्तू संच देण्याच्या निर्णयाला बांधकाम कामगार महासंघाचा तीव्र विरोध-जिल्हा सचिव हेमंतकुमार परब• अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची बदली• अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याच्या गुन्ह्यातून आरोपीची ससन्मान निर्दोष मुक्तता -अॅड. अशपाक शेख यांच्या युक्तिवादाला यश• बॉडी बिल्डिंगच्या मैदानात युवा नेते विशाल परब यांच्या वक्तृत्वाची तुफानी बॅटिंग!• जानेवारीत सिंपन चषक २०२७ क्रिकेट स्पर्धा• आ. प्रसाद लाड, स्वप्निल फाटक यांना समाजाची संस्था कदापी बळकावु देणार नाही• महिलांसाठी व्यावसायीक व्यासपिठ हा स्तुत्य उपक्रम-प्रभाकर सावंत• *इयत्ता १० वी व १२ वीच्या फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षांच्या आवेदनपत्रांना मुदतवाढ• आ. प्रसाद लाड, स्वप्निल फाटक यांना समाजाची संस्था कदापी बळकावु देणार नाही• ग्रामीण रस्त्यांवरील झाडी - झुडपांमुळे वाहनचालक, पादचारी हैराण• बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणारे शैक्षणिक थेट आर्थिक लाभ रद्द करून, मूलभूत वस्तू संच देण्याच्या निर्णयाला बांधकाम कामगार महासंघाचा तीव्र विरोध-जिल्हा सचिव हेमंतकुमार परब• अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची बदली

वनराई बंधाऱ्यांमुळे सिंधुदुर्गात जलसंधारणाला हातभार – खा. नारायण राणे

📅 १ नोव्हेंबर, २०२६👁 ७
वनराई बंधाऱ्यांमुळे सिंधुदुर्गात जलसंधारणाला हातभार – खा. नारायण राणे

*कोंकण एक्सप्रेस

*वनराई बंधाऱ्यांमुळे सिंधुदुर्गात जलसंधारणाला हातभार – खा. नारायण राणे

*हुंबरट येथे बंधाऱ्याची पाहणी

*सिंधुदुर्ग-कणकवली : संजना हळदिवे

जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हाभरात लोकसहभागातून राबविण्यात आलेली जलसंधारणाची मोहीम कौतुकास्पद आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, स्वयंसेवी संस्था आणि ग्रामस्थांच्या सहभागातून १० हजारांहून अधिक वनराई बंधारे उभारण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांमुळे पाणी अडविणे आणि जलसंधारणाच्या प्रयत्नांना मोठा हातभार लागला आहे, अशी प्रतिक्रिया खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केली.

कणकवली तालुक्यातील हुंबरट येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ जवळ ग्रामपंचायतीच्या वतीने उभारण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्याची खासदार नारायण राणे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. बंधाऱ्यात साठलेल्या पाण्याची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. लोकसहभागातून अशा प्रकारचे अधिकाधिक बंधारे उभारल्यास भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी निश्चितच मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

जलसंधारणाच्या या कामात प्रशासनासोबतच स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविण्याच्या अशा प्रयत्नांमुळे भूजलसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार असून, भविष्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी हे उपक्रम उपयुक्त ठरतील, असेही खा. राणे यांनी नमूद केले.

यावेळी कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी प्रमोद ठाकूर, उपसरपंच नितीन बागवे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, संतोष चव्हाण, सदस्य संदीप होळकर, नितीका बागवे, पोलीस पाटील बाबू गुरव, कोतवाल प्रदीप जाधव, गणेश गुरव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.ते.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →