शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• नाईक ट्रॅव्हल्स (NAIK TRAVELS)• कणकवलीत १ नोव्हेंबर रोजी पाककला प्रशिक्षण, स्पर्धा• गोपुरीतील चिकूच्या बागेतील व्यासपीठाला माधवराव गाडगीळ यांचे नाव• सुनील चव्हाण यांचे निधन• इयत्ता 4 थी आणि 7 वीची शिष्यवृत्ती परीक्षा 21 फेब्रुवारी 2027 रोजी• नानिवडे-वाडेकरवाडी प्रकल्पाचा 16 वर्षांचा वनवास संपला• मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे ३० ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर• सावंतवाडी पाणी पुरवठा घोटाळा: जिल्हाधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष का?• घनकचरा व्यवस्थापन नियमांची प्रभावी अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे• कणकवलीत शनिवार पासून अंडरआर्म स्पर्धा• नाईक ट्रॅव्हल्स (NAIK TRAVELS)• कणकवलीत १ नोव्हेंबर रोजी पाककला प्रशिक्षण, स्पर्धा• गोपुरीतील चिकूच्या बागेतील व्यासपीठाला माधवराव गाडगीळ यांचे नाव• सुनील चव्हाण यांचे निधन• इयत्ता 4 थी आणि 7 वीची शिष्यवृत्ती परीक्षा 21 फेब्रुवारी 2027 रोजी• नानिवडे-वाडेकरवाडी प्रकल्पाचा 16 वर्षांचा वनवास संपला• मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे ३० ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर• सावंतवाडी पाणी पुरवठा घोटाळा: जिल्हाधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष का?• घनकचरा व्यवस्थापन नियमांची प्रभावी अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे• कणकवलीत शनिवार पासून अंडरआर्म स्पर्धा

कणकवलीत १ नोव्हेंबर रोजी पाककला प्रशिक्षण, स्पर्धा

📅 ३० ऑक्टोबर, २०२६👁 ३ब्रेकिंग
कणकवलीत १ नोव्हेंबर रोजी पाककला प्रशिक्षण, स्पर्धा

*कोंकण एक्सप्रेस

  • *कणकवलीत १ नोव्हेंबर रोजी पाककला प्रशिक्षण, स्पर्धा

*रोटरी व इनरव्हील क्लबतर्फे आयोजन

*कणकवली : संजना हळदिवे

रोटरी व इनरव्हील क्लब कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार १ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५ यावेळेत लक्ष्मी विष्णू हॉल, कॉलेज रोड कणकवली येथे एक दिवसीय पाककला प्रशिक्षण होणार आहे. तसेच पाककला स्पर्धा आयोजित केली आहे.

पाककला प्रशिक्षणात गव्हापासून बनवता येणारी बिस्किट, प्रोटिन्स चॉकलेट बार, गुलाब जामुन केक यासारख्या नावीन्यपूर्ण विविध पाककला माहितीसह प्रत्यक्ष करून दाखवल्या जाणार आहेत. त्यानंतर पाककला स्पर्धा संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत होणार आहे. स्पर्धेसाठी आरोग्यदायक पौष्टिक दिवाळी फराळ-कोणताही एक पदार्थ हा विषय असून सहभागी स्पर्धकांनी आपला पदार्थ घरीच तयार आणायचा आहे. स्पर्धा संपल्यावर लगेच परीक्षण होऊन विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रथम क्रमांकास गॅस शेगडी, द्वितीय क्रमांक कुकर, तृतीय क्रमांकास इडलीमेकर, उत्तेजनार्थ एक बक्षीस अशी बक्षिसे आहेत. तरी प्रशिक्षण व स्पर्धेच्या माहितीसाठी दिशा अंधारी, राजश्री रावराणे यांना संपर्क करावा, असे आवाहन रोटरी अध्यक्षा सुप्रिया नलावडे यांनी केले आहे. दिवाळी सणाची पूर्वतयारी म्हणून नावीन्यपूर्ण पाककला शिकण्याची संधी महिलांना मिळणार आहे.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →