अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याच्या गुन्ह्यातून आरोपीची ससन्मान निर्दोष मुक्तता -अॅड. अशपाक शेख यांच्या युक्तिवादाला यश

*कोंकण एक्सप्रेस
*वेंगुर्ला POCSO प्रकरण:
*अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याच्या गुन्ह्यातून आरोपीची ससन्मान निर्दोष मुक्तता;
*अॅड. अशपाक शेख यांच्या युक्तिवादाला यश
*वेंगुर्ला ; प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणे आणि तिच्याशी कथित गैरकृत्य केल्याच्या अत्यंत गंभीर प्रकरणात मा. न्यायालयाने आरोपी ओम माधव बोंगाणे (वय २०, रा. पुणे) याला सर्व आरोपांतून ससन्मान निर्दोष मुक्त केले आहे. बचाव पक्षाचे मुख्य वकील अॅड. अशपाक शेख यांनी युक्तिवादादरम्यान मांडलेली भक्कम कायदेशीर बाजू आणि उपलब्ध साक्षी-पुराव्यांच्या आधारे हा निकाल देण्यात आला आहे.
नेमकी घटना काय होती?
प्राप्त माहितीनुसार, दिनांक ०४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी शिरोडा येथील बा. म. गोगटे कॉलेजजवळून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा रजि. क्र. १२४/२०२४ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२), ७५ (१) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (POCSO) च्या कलम ८ व १२ नुसार गुन्हा दाखल केला होता.
पोलीस तपासादरम्यान, दिनांक ०७ ऑक्टोबर २०२४ रोजी सदर मुलगी बुलढाणा येथे आरोपीसोबत मिळून आली. त्यानंतर पोलिसांनी आवश्यक तपास पूर्ण करून मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
न्यायालयात काय घडले?
ओरोस येथील मे. विशेष न्यायाधीश यांच्या न्यायालयात 'विशेष खटला क्रमांक ५९/२०२४' अंतर्गत या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले.
या सुनावणीदरम्यान आरोपीचे मुख्य वकील अॅड. अशपाक शेख यांनी आरोपीची निर्दोषता अत्यंत ठामपणे न्यायालयासमोर मांडली. पीडितेला फूस लावून पळवून नेणे अथवा तिच्याशी कोणतेही गैरकृत्य केल्याचा आरोप त्यांनी युक्तिवादातून फेटाळून लावला.
मा. न्यायालयाचा अंतिम निकाल
बचाव पक्षाच्या वकिलांनी मांडलेला युक्तिवाद आणि प्रकरणातील उपलब्ध साक्षी-पुरावे सखोलपणे विचारात घेऊन, मा. न्यायाधीश श्री. एस. टी. त्रिपाठी साहेब यांनी दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी आरोपी ओम माधव बोंगाणे याची सर्व आरोपांतून ससन्मान निर्दोष मुक्तता करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
सदर हाय-प्रोफाइल प्रकरणात आरोपीचे मुख्य वकील म्हणून अॅड. अशपाक शेख यांनी बाजू मांडली, तर त्यांना अॅड. नामदेव मठकर, अॅड. विनय रजपूत, अॅड. कैस शेख, अॅड. भुषण कदम, अॅड. हरेश वरावडेकर आणि अॅड. आसिम मुजावर यांनी कायदेशीर कामकाजात मोलाचे साहाय्य केले.
जाहिरातवेंगुर्ला मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगमहिलांसाठी व्यावसायीक व्यासपिठ हा स्तुत्य उपक्रम-प्रभाकर सावंत
ब्रेकिंगथेंब थेंब साठवणुकीतून जलसमृद्धीचा ध्यास!, युवा नेते विशाल परब यांच्या ‘पाणीदार’ संकल्पनेला ग्रामस्थांची समर्थ साथ!
ब्रेकिंगमहिलांच्या कर्तृत्वाचा गौरव; वेंगुर्ल्यात तीन दिवसीय प्रदर्शन महोत्सव!

