मंगळवार, २० ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• कणकवलीत ३ नोव्हेंबरपासून भाजपच्या वतीने 'दिवाळी बाजारा'चे आयोजन• मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेचे वर्चस्व• कोमसापच्या कणकवली शाखा अध्यक्षपदी गणेश जेठे• कणकवली शहरातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरसेवकांनी मानले पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार• शिरवल खासकीलवाडीतील रस्त्याची दुरवस्था• शिरवल खासकिलवाडीत संदीप चौकेकर मित्रमंडळाचा महिलांसाठी आरोग्य व स्वच्छता अभियानाचा उपक्रम!• सिंधुदुर्गातील जलसंधारणाच्या शाश्वत उपाययोजनाना मिळणार• सासोली येथे नूतन तलाठी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण• वनरक्षक महिलेच्या आत्महत्याप्रकरणी आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर• ज्ञानेश कुमारांचा राजीनामा न झाल्यास वैभववाडीत आंदोलन छेडणार• कणकवलीत ३ नोव्हेंबरपासून भाजपच्या वतीने 'दिवाळी बाजारा'चे आयोजन• मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेचे वर्चस्व• कोमसापच्या कणकवली शाखा अध्यक्षपदी गणेश जेठे• कणकवली शहरातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरसेवकांनी मानले पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार• शिरवल खासकीलवाडीतील रस्त्याची दुरवस्था• शिरवल खासकिलवाडीत संदीप चौकेकर मित्रमंडळाचा महिलांसाठी आरोग्य व स्वच्छता अभियानाचा उपक्रम!• सिंधुदुर्गातील जलसंधारणाच्या शाश्वत उपाययोजनाना मिळणार• सासोली येथे नूतन तलाठी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण• वनरक्षक महिलेच्या आत्महत्याप्रकरणी आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर• ज्ञानेश कुमारांचा राजीनामा न झाल्यास वैभववाडीत आंदोलन छेडणार

मळेवाड कोंडुरे येथील सर्व बंधारे दुरुस्ती कामाला मंजुरी

📅 २० ऑक्टोबर, २०२६👁 ३#nitesh rane
मळेवाड कोंडुरे येथील सर्व बंधारे दुरुस्ती कामाला मंजुरी

*कोंकण एक्सप्रेस

*मळेवाड कोंडुरे येथील सर्व बंधारे दुरुस्ती कामाला मंजुरी,

* जि प सदस्य सातोसकार प स सदस्य मराठे यांच्या पाठपुराव्याला यश,

*पालकमंत्री नितेश राणे यांचे मानले आभार

*सावंतवाडी - प्रतिनिधि

सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कार्यक्षेत्रातील असलेल्या 6 बंधाऱ्यांच्या दुरुस्ती कामाला मंजुरी मिळाली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कार्यक्षेत्रात 6 काँक्रिट बंधारे असून मोठ्या प्रमाणात हे बंधाऱ्यांच्या माध्यमातून नदीचे पाणी अडवले जाते. यामुळे मळेवाड गावातील अनेक विहिरी व शेतजमिनी ओलिताखाली येतात. बरीच वर्षे झाल्याने या बंधाऱ्यांची दुरुस्ती होणे गरजेचे होते.काही बंधारे नादुरुस्त झाल्याने त्यात पाणी अडवणे बंद होते. मात्र आता कमी पाऊस पडल्याने ठीक ठिकाणी पाणी अडवून ते जमिनीत मुरावे असा उपक्रम शासनाने हाती घेतला असून याच अनुषंगाने अशा बंद अवस्थेतील व दुरुस्ती करणे गरजेचे आहे अशा बंधाऱ्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामुळे मळेवाड कोंडुरे गावातील कोंडुरे कदमवाडी, मळेवाड राणेवाडी, मळेवाड नाईकवाडी,मळेवाड भटवाडी,मळेवाड चव्हाणवाडी मळेवाड म्हापसेकरवाडी या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तात्काळ या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होईल.यामध्ये बंधाऱ्यांच्या प्लेट,गाळ काढणे, प्लेट गाळे दुरुस्त करणे, संरक्षण भिंत बांधणे अशी कामे समाविष्ट आहेत. या सर्व कामांचा जिल्हा परिषद सदस्य अपर्णा सातोसकर व पंचायत समिती सदस्य धनश्री मराठे यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून सदरची कामे महाराष्ट्र राज्याचे मत्स्य बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंजूर केल्या बद्दल पालकमंत्री राणे यांचे आभार मानण्यात येत आहेत.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सावंतवाडी मधील अधिक बातम्या

अधिक पहा →