शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• सिंधुदुर्गातील जलसंधारणाच्या शाश्वत उपाययोजनाना मिळणार• सासोली येथे नूतन तलाठी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण• वनरक्षक महिलेच्या आत्महत्याप्रकरणी आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर• ज्ञानेश कुमारांचा राजीनामा न झाल्यास वैभववाडीत आंदोलन छेडणार• वापरत नसलेला चारा कापणी व वाहतुकीचे नियोजन करण्याचे निर्देश-पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांच्या सूचना• सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनराई बंधाऱ्यांची लोकचळवळ बनल्याचे समाधान - पालकमंत्री नितेश राणे• जलजीवन मिशनची रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री आक्रमक!• *प्रखर हिंदुत्ववादी नेते तथा मंत्री नितेश राणे यांनी दाखवून दिला प्रखर राष्ट्राभिमान!• प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदगाव येथे ‘सिंधू जनसंवाद आरोग्य यात्रे’चा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ• पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याहस्ते हेत येथे कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन• सिंधुदुर्गातील जलसंधारणाच्या शाश्वत उपाययोजनाना मिळणार• सासोली येथे नूतन तलाठी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण• वनरक्षक महिलेच्या आत्महत्याप्रकरणी आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर• ज्ञानेश कुमारांचा राजीनामा न झाल्यास वैभववाडीत आंदोलन छेडणार• वापरत नसलेला चारा कापणी व वाहतुकीचे नियोजन करण्याचे निर्देश-पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांच्या सूचना• सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनराई बंधाऱ्यांची लोकचळवळ बनल्याचे समाधान - पालकमंत्री नितेश राणे• जलजीवन मिशनची रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री आक्रमक!• *प्रखर हिंदुत्ववादी नेते तथा मंत्री नितेश राणे यांनी दाखवून दिला प्रखर राष्ट्राभिमान!• प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदगाव येथे ‘सिंधू जनसंवाद आरोग्य यात्रे’चा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ• पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याहस्ते हेत येथे कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन

पालकमंत्री नितेश राणेंकडून सावंतवाडीत दुर्गा मातेंचे दर्शन

📅 १७ ऑक्टोबर, २०२६👁 १#nitesh rane
पालकमंत्री नितेश राणेंकडून सावंतवाडीत दुर्गा मातेंचे दर्शन

*कोंकण एक्सप्रेस

*पालकमंत्री नितेश राणेंकडून सावंतवाडीत दुर्गा मातेंचे दर्शन

*जिल्ह्यात दहा हजार वनराई बंधारे बांधणार ; ७ हजार बंधारे पूर्ण

*राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी सरकार्य

*सावंतवाडी : प्रतिनिधी

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी शुक्रवारी सायंकाळी सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील आत्मेश्वर मंदिरात स्थानापन्न केलेल्या नवदुर्गेचे दर्शन घेतले. तसेच त्यांनी कोलगाव पांडवनगरी येथील श्री देव वस नवरात्रोत्सव मंडळाच्या दुर्गा मातेचे देखील दर्शन घेतले.

यावेळी त्यांनी राज्यातील दुष्काळाचे संकट दूर होवो व शेतकऱ्यांना दिलासा मिळो, अशी प्रार्थना केली. जिल्ह्यातील दुष्काळाचे संकट टाळण्यासाठी जिल्ह्यात किमान १० हजार वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट असून त्यापैकी ७ हजार बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. लवकरच उर्वरित बंधारे देखील बांधण्यात येतील त्यासाठी जिल्ह्यातील सर्वच स्तरातील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात दुष्काळग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते पुखराज पुरोहित, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष तथा सभापती सुधीर आडीवरेकर, सभापती आनंद नेवगी, सौ. मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, नगरसेवक प्रतीक बांदेकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, नगरसेविका दुलारी रांगणेकर, नीलम नाईक, सुकन्या टोपले, सुनिता पेडणेकर, माजी नगरसेवक उदय नाईक, नंदू गावडे, विराग मडकईकर, कोलगाव नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार सागर चव्हाण, गटनेते बाबुराव चव्हाण, भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते संतोष गांवस, किशोर चिटणीस, कृष्णा धुळपणवार, बाळ चोणकर यांसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक ग्रामस्थ महिला व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सावंतवाडी मधील अधिक बातम्या

अधिक पहा →