शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• उपक्रमशील तथा तंत्रस्नेही शिक्षक गोविंदराव जाधव यांना ‘आयडॉल शिक्षक सन्मान’• सावंतवाडीत उद्या नरकासुरांच्या प्रतिकृतींतून कलाविष्काराचा जागर!• दिवाळीनिमित्त कणकवलीत दोन दिवस रंगणार सुरेल संगीताची मैफल!• सिंधुदुर्गात क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या संघटनात्मक बांधणीला वेग• वेंगुर्ला तालुक्यात वसुबारस उत्साहात; गोमातेचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त• पाणी वाचवा, जीवन वाचवा संदेश देणारे आकर्षक पारंपरिक आकाशकंदील!• भाजपाच्या कार्यालयातच ठेकेदार पदाधिकाऱ्यांमध्ये हमरीतुमरी!• पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी केलेल्या उपोषणाला चार दिवस झाले तरी उपोषण स्थळी जिल्हाधिकारी फिरकल्या नाहीत• केंद्र शाळा साळशी नं. १ शाळेच्या शिक्षिका स्मिता कोदले यांना राज्यस्तरीय ‘आयडॉल टीचर’ पुरस्कार• बंद झालेली महालॅबची प्रयोगशाळा व रक्तनमुना संकलन सेवा तात्काळ पूर्ववत करा• उपक्रमशील तथा तंत्रस्नेही शिक्षक गोविंदराव जाधव यांना ‘आयडॉल शिक्षक सन्मान’• सावंतवाडीत उद्या नरकासुरांच्या प्रतिकृतींतून कलाविष्काराचा जागर!• दिवाळीनिमित्त कणकवलीत दोन दिवस रंगणार सुरेल संगीताची मैफल!• सिंधुदुर्गात क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या संघटनात्मक बांधणीला वेग• वेंगुर्ला तालुक्यात वसुबारस उत्साहात; गोमातेचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त• पाणी वाचवा, जीवन वाचवा संदेश देणारे आकर्षक पारंपरिक आकाशकंदील!• भाजपाच्या कार्यालयातच ठेकेदार पदाधिकाऱ्यांमध्ये हमरीतुमरी!• पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी केलेल्या उपोषणाला चार दिवस झाले तरी उपोषण स्थळी जिल्हाधिकारी फिरकल्या नाहीत• केंद्र शाळा साळशी नं. १ शाळेच्या शिक्षिका स्मिता कोदले यांना राज्यस्तरीय ‘आयडॉल टीचर’ पुरस्कार• बंद झालेली महालॅबची प्रयोगशाळा व रक्तनमुना संकलन सेवा तात्काळ पूर्ववत करा

सावंतवाडीत उद्या नरकासुरांच्या प्रतिकृतींतून कलाविष्काराचा जागर!

📅 ७ नोव्हेंबर, २०२६👁 १०ब्रेकिंग#विशालपरब#सावंतवाडी
सावंतवाडीत उद्या नरकासुरांच्या प्रतिकृतींतून कलाविष्काराचा जागर!

*कोंकण एक्सप्रेस

*सावंतवाडीत उद्या नरकासुरांच्या प्रतिकृतींतून कलाविष्काराचा जागर!,

*नरकासुरांच्या महाकाय प्रतिकृतींचा रंगणार अद्भुत थरार!

*भाजपाचे ज्येष्ठ विनोद राऊळ व उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचे कल्पक नियोजन तर युवा नेते विशाल परब यांचे दमदार प्रायोजन!

*भाजपा युवा मोर्चाचा सांस्कृतिक उत्सवासाठी पुढाकार!

*स्पर्धा फक्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मर्यादित असणार,

*खुला गट, बालगटासह रील स्पर्धेचीही धूम रंगणार!

*सावंतवाडी : प्रतिनिधि

दीपोत्सवाच्या मंगलमय पर्वात कोकणच्या सांस्कृतिक परंपरेचा जल्लोष अधिकच उंचावण्यासाठी सावंतवाडीत उद्या नरकासुरांच्या कलात्मक प्रतिकृतींचा थरार अनुभवायला मिळणार आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पुढाकारातून आणि भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते विशाल परब यांच्या भरीव प्रायोजनातून शनिवार, ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मर्यादित भव्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सावंतवाडीच्या दीपावली उत्सवात यंदा स्पर्धात्मक उत्साहाची नवी ठिणगी पडणार असून, शहरात नरकासुर स्पर्धेची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रेरणेतून, ज्येष्ठ नेते विनोद राऊळ व उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मोती तलाव परिसरातील अमूल आईस्क्रीमसमोरील कॉर्नरवर, शिवरामराजे भोसले यांच्या पुतळ्याजवळ हा सांस्कृतिक सोहळा रंगणार आहे.

या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील स्पर्धकांनाच सहभागाची संधी देण्यात आली आहे. खुला गट आणि बालगट अशा दोन स्वतंत्र गटांत ही स्पर्धा पार पडणार असून, नरकासुराच्या भव्य प्रतिकृतींमधून कलात्मकता, कल्पकता, रंगसंगती, सांघिक कौशल्य आणि मेहनतीचे अनोखे दर्शन घडणार आहे. विशेष म्हणजे पारंपरिक नरकासुर स्पर्धेला आधुनिक डिजिटल माध्यमांची जोड देण्यासाठी स्वतंत्र रील स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष हितेन नाईक यांनी दिली.

नरकासुरांच्या प्रतिकृतींतून कलाविष्काराचा जागर!

नरकासुर स्पर्धा म्हणजे केवळ आकर्षक प्रतिकृतींचे प्रदर्शन नव्हे, तर युवकांच्या कल्पकतेला, कलागुणांना आणि सांघिक शक्तीला मिळणारे हक्काचे व्यासपीठ आहे. दीपावलीच्या पारंपरिक उत्सवाशी जोडलेली ही सांस्कृतिक परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपा युवा मोर्चाने उचललेले हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बालगटाच्या सहभागामुळे चिमुकल्यांच्या कलागुणांनाही प्रोत्साहन मिळणार असून, रील स्पर्धेमुळे उत्सवाची रंगत डिजिटल विश्वातही अनुभवता येणार आहे.

क्रीडा, आरोग्य अन् संस्कृतीचा भाजपाकडून त्रिवेणी संगम!

युवकांच्या ऊर्जेला विधायक दिशा देण्याचा ध्यास घेत भाजपाकडून सावंतवाडीत विविध उपक्रमांची मालिका राबविण्यात येत आहे. तीन दिवसांपूर्वी शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून सुदृढ शरीराचा आणि व्यायाम संस्कृतीचा संदेश देण्यात आला, तर आता नरकासुर स्पर्धेच्या माध्यमातून कोकणच्या सांस्कृतिक वैभवाचा जागर घडविला जाणार आहे. क्रीडाशक्तीला प्रोत्साहन, आरोग्याबाबत जागरूकता आणि स्थानिक कलासंस्कृतीचे संवर्धन अशा तीन महत्त्वपूर्ण पैलूंचा संगम या उपक्रमांतून साधला जात आहे.

युवकांच्या अंगी असलेली ऊर्जा केवळ उत्सवापुरती मर्यादित न राहता ती कला, क्रीडा, आरोग्य आणि समाजहिताच्या विधायक कार्यासाठी उपयोगात यावी, हा या उपक्रमांमागील व्यापक दृष्टिकोन आहे. विशाल परब यांच्या प्रायोजनातून स्थानिक युवकांना मिळणारे हे व्यासपीठ त्यांच्या कलागुणांना नवी झळाळी देणारे ठरणार आहे.

सावंतवाडीकरांनो, चला... नरकासुर स्पर्धेचा जल्लोष अनुभवूया!

दीपावलीच्या आनंदाला सांस्कृतिक उत्सवाची किनार लाभावी, स्पर्धकांच्या कलाविष्काराला प्रोत्साहन मिळावे आणि स्थानिक परंपरेचा वारसा अधिक समृद्ध व्हावा, यासाठी सावंतवाडीकरांनी या स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्पर्धकांचा उत्साह वाढवून या सांस्कृतिक पर्वाचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन भाजपा युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

असा घ्या स्पर्धेत सहभाग -

या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष हितेन नाईक (मोबाईल क्रमांक - 8291494897) तसेच पंकज तुळसुलकर (मोबाईल क्रमांक - 9130683472) यांच्याशी सकाळी १० वाजेपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आरोग्याचा संकल्प... क्रीडाशक्तीचा हुंकार... अन् संस्कृतीचा दिमाखदार जागर! या त्रिवेणी संगमातून यंदाची सावंतवाडीची दीपावली केवळ प्रकाशपर्व न राहता कलागुण, उत्साह आणि सांस्कृतिक ऐक्याचा अविस्मरणीय सोहळा ठरणार, यात शंका नाही!

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सावंतवाडी मधील अधिक बातम्या

अधिक पहा →