स्व-कष्टातून कर्तृत्वाचं शिखर गाठणारी नवदुर्गा सौ शर्मिला केळुसकर मॅडम

*कोंकण एक्सप्रेस
*स्व-कष्टातून कर्तृत्वाचं शिखर गाठणारी नवदुर्गा सौ शर्मिला केळुसकर मॅडम
* कणकवली : प्रतिनिधी
गरीबी शिक्षणाच्या आड कधीच येत नाही . परिस्थितीशी संघर्ष करत मुंबई महानगरात विज्ञान शाखेतील उच्चशिक्षण पूर्ण करून कणकवली शहरात स्वकर्तृत्वाने यशाची शिखरे पादाक्रांत करून विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत सौ शर्मिला केळूसकर मॅडम विज्ञान शिक्षिका म्हणून रुजू झाल्या आणि अल्पावधित विद्यार्थी प्रिय व शिस्तप्रिय शिक्षिका म्हणून समाजात लोकप्रिय झाल्या . यासाठी प्रथम केळुसकर मॅडम यांनी खूप परिश्रमपूर्वक साधना केली आहे . विज्ञान विषयाचा सखोल अभ्यास तसेच इंग्लिश भाषेवर प्रभूत्व या जोरावर मॅडमनी विज्ञानसारखा अवघड विषय आपल्या अध्यापन कौशल्यातून सहज सोपा करून शिकविण्याची हातोटी यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना विज्ञानाची अभिरुची निर्माण करणारी शिक्षिका म्हणून पालक वर्गात प्रिय झाल्या . कोणताही अध्यापक एकाकी मोठा होत नसतो त्यासाठी प्रयत्नाची साधना करून यशाची किनार गाठावी लागते मुळातच केळुसकर मॅडम या अष्टपैलू व्यक्तीमत्व असल्यामुळे संगीत ' नृत्य , नाट्य अभिनय , योगासने 'वक्तृत्व , निवेदन शैली या विविध कौशल्याने समाज मनावर निर्भिडपणे अधिराज्य निर्माण करून स्वतःची ओळख निर्माण करणारी माणसे विरळाच असतात . सौ शर्मिला केळूसकर मॅडम या मुळातच कवी मनाच्या असल्यामुळे स्त्रीयांच्या दुःखाचा आविष्कार असलेल्या कविता रेखाटून काव्यप्रांतात ही आगळा वेगळा ठसा उमटविला आहे महाराष्ट्रच्या सुप्रसिद्ध समिक्षिका डॉ निर्मोही फडके मॅडम यांनी निखळ कविता लिहिणारी चोखंदळ कवयित्री म्हणून मॅडमच्या कवितेचं कौतुक केले आहे . बाल विज्ञान नाट्य लेखन करून नाट्य प्रांतात सुद्धा मॅडमनी वेगळाच ठसा उमटविला आहे लोकनृत्य , लोककला , यांची उत्तम जाण असल्यामुळे प्रशालेत विद्यार्थांचे नृत्य दिग्दर्शन मॅडमनी उत्तम प्रकारे करून विविध स्पर्धेत मुलांना स्वखर्चानं सहभाग नोंदवून ब क्षसपात्र ठरलेल्या आहेत . सौ केळुसकर मॅडम या धाडशीवृत्तीच्या असल्याने अनेक संकटांना सामोरे जात स्वतःच व्यक्तिमत्व अभ्यासातून अफाट वाचनातून सिद्ध करण्याची शक्ती प्राप्त केली . शिक्षिका म्हणून पवित्र पेशा स्वीकारल्या नंतर सामाजिक भान ही त्यांनी राखलेले आहे या सामाजिक भानाला वैज्ञानिक रूप मॅडमनी केवळ आपल्या अभ्यासाची जोड देऊन दाखवून दिले खरचं स्रीशक्तीची ही विविध रूपं एकाच व्यक्ती जवळ कशी असतात याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे सौ . केळूसकर मॅडम नाटळ सारख्या ग्रामीण भागातील शिक्षण संस्थेने दुर्कभ्य अशा नवदुर्गाना प्रकाशात आणून दाही दिशा चैतन्याचं रूप उलगडून दाखविले याच प्रकाशाच्या मालिकेत विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेच्या विज्ञान शिक्षिका सौ शर्मिला केळुसकर मॅडम या आहेत उच्च ध्येय उराशि बाळगून जीवनाची वाटचाल उदात्य हेतूने केली तरच जीवन सार्थक होत असतं याचा प्रत्यय आजच्या या सन्मानने दिसून आला सौ केळुसकर मॅडम यांना भावी वाटचालीसाठी असचं उदात्य कार्य घडत जावो यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!
जाहिरातकणकवली मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
राजवाडी उत्कर्ष मंडळ नाटळ मुंबई संचलित संस्था व माध्यमिक विद्यालय नाटळ यांच्या वतीने नवदुर्गा सन्मान सोहळा संपन्न

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले नवीन कुर्ली येथे दुर्गादेवीचे दर्शन

कणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधारा

