वैभववाडी तालुक्यातील विविध नवरात्रोत्सव मंडळांना पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतल्या भेटी

*कोंकण एक्सप्रेस
*वैभववाडी तालुक्यातील विविध नवरात्रोत्सव मंडळांना भेटी
*दुर्गा मातेचे पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले दर्शन
*सर्वांच्या सुख, समाधान, उत्तम आरोग्य आणि समृद्धीसाठी देवीचरणी प्रार्थना
*वैभववाडी : प्रतिनिधी
तालुक्यातील विविध नवरात्रोत्सव मंडळांना भेटी देऊन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी माता दुर्गेचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीच्या चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख, समाधान, उत्तम आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. माता दुर्गेच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात सुख-शांती, आनंद आणि समृद्धी नांदो, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राची प्रगती होवो, अशी मनोकामना त्यांनी व्यक्त केली.
या भेटीदरम्यान उपस्थित भाविक, नवरात्रोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. तसेच सर्वांना नवरात्रोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, देवीच्या दर्शनासाठी भाविकांची उपस्थिती पाहायला मिळाली.
जाहिरातवैभववाडी मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगज्ञानेश कुमारांचा राजीनामा न झाल्यास वैभववाडीत आंदोलन छेडणार
ब्रेकिंगपालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याहस्ते हेत येथे कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर वैभववाडीत दुर्गामातेचे घेतले दर्शन
ब्रेकिंग