शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• वापरत नसलेला चारा कापणी व वाहतुकीचे नियोजन करण्याचे निर्देश-पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांच्या सूचना• सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनराई बंधाऱ्यांची लोकचळवळ बनल्याचे समाधान - पालकमंत्री नितेश राणे• जलजीवन मिशनची रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री आक्रमक!• *प्रखर हिंदुत्ववादी नेते तथा मंत्री नितेश राणे यांनी दाखवून दिला प्रखर राष्ट्राभिमान!• प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदगाव येथे ‘सिंधू जनसंवाद आरोग्य यात्रे’चा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ• पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याहस्ते हेत येथे कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन• भाटकर कुटुंबीयांची आमदार प्रमोद जठार यांनी घेतली भेट• सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा स्तुत्य उपक्रम : वनराई बंधाऱ्यांसाठी २५ हजार पिशव्यांचे वितरण• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• वापरत नसलेला चारा कापणी व वाहतुकीचे नियोजन करण्याचे निर्देश-पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांच्या सूचना• सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनराई बंधाऱ्यांची लोकचळवळ बनल्याचे समाधान - पालकमंत्री नितेश राणे• जलजीवन मिशनची रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री आक्रमक!• *प्रखर हिंदुत्ववादी नेते तथा मंत्री नितेश राणे यांनी दाखवून दिला प्रखर राष्ट्राभिमान!• प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदगाव येथे ‘सिंधू जनसंवाद आरोग्य यात्रे’चा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ• पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याहस्ते हेत येथे कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन• भाटकर कुटुंबीयांची आमदार प्रमोद जठार यांनी घेतली भेट• सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा स्तुत्य उपक्रम : वनराई बंधाऱ्यांसाठी २५ हजार पिशव्यांचे वितरण• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर

*प्रखर हिंदुत्ववादी नेते तथा मंत्री नितेश राणे यांनी दाखवून दिला प्रखर राष्ट्राभिमान!

📅 १६ ऑक्टोबर, २०२६👁 ८ब्रेकिंग#nitesh rane#sindhudurg
*प्रखर हिंदुत्ववादी नेते तथा मंत्री नितेश राणे यांनी दाखवून दिला प्रखर राष्ट्राभिमान!

*कोंकण एक्सप्रेस

*प्रखर हिंदुत्ववादी नेते तथा मंत्री नितेश राणे यांनी दाखवून दिला प्रखर राष्ट्राभिमान!

*वंदे मातरम पूर्ण म्हणण्याचे केले आवाहन

*सिंधुदुर्ग: प्रतिनिधी

हलाल प्रमाणपत्र विरोधी कार्यक्रमाच्या “बांदा ते चांदा हिंदू जनजागृती” मोहिमेचा शुभारंभ आज प्रखर हिंदुत्ववादी नेते तथा मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बांदा येथे पार पडला. यावेळी मंत्री नितेश राणे उपस्थितीत हिंदू बंधू आणि भगिनींना मौलिक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या समारोपावेळी वंदे मातरम गीत उपस्थितांनी म्हटले. यापूर्वी सर्व कार्यक्रमात फक्त पहिली दोन कडवी म्हटली जात असत. मात्र, ऑगस्ट २०२६ मध्ये नवीन कायदा पास करून आता सर्व कार्यक्रमात संपूर्ण सहा कडव्यांचे वंदे मातरम् म्हणणे सक्तीचे करण्यात आले आहे. या मोहिमेच्या समारोप सोहळ्यात “वंदे मातरम”ची पहिली दोन कडवी म्हटली गेली. यावेळी हिंदुत्ववादी नेते नितेश राणे यांनी “वंदे मातरम” गीत

संपूर्ण म्हणण्याचा आग्रह करत सर्व उपस्थित नागरिकांना तसे म्हणण्यास आवाहन केले. यावेळी मोबाईलमधून “वंदे मातरम” ऐकून सर्वांनी परत एकदा वंदे मातरम म्हटले. या उदाहरणावरून राष्ट्राभिमान कसा असावा , तो आपल्या अंगीकृत कसा कसा करणे आवश्यक आहे हे प्रखर हिंदुत्ववादी नेते तथा मंत्री नितेश राणे यांनी दाखवून दिले. आजच्या युवापिढीसाठी प्रखर राष्ट्राभिमानाचे उदाहरण मंत्री नितेश राणे यांनी या कार्यक्रमातून दाखवून दिले.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सावंतवाडी मधील अधिक बातम्या

अधिक पहा →