मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे• सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!• नारायण सुर्वेंच्या स्मारकासाठी 2 कोटीचा निधी मंजूर• आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती!; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ• निष्ठावंत कार्यकर्ता, विश्वासू सहकारी हरपला*• नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!• वक्तृत्व स्पर्धेत विठ्ठल दळवी प्रथम• पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन• मालवण - वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार• कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब• सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे

कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब

तुळस येथे ‘प्रदेशाध्यक्ष चषक २०२६’ राज्यस्तरीय संगीत भजन स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन; पाच जिल्ह्यांतील भजनी मंडळांचा सहभाग

📅 ३ ऑक्टोबर, २०२६👁 १७ब्रेकिंग
कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब

*कोंकण एक्सप्रेस*

*कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया! : भाजप युवा नेते विशाल परब*

*तुळस येथे ‘प्रदेशाध्यक्ष चषक २०२६’ राज्यस्तरीय संगीत भजन स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन; पाच जिल्ह्यांतील भजनी मंडळांचा सहभाग*

भक्तिरसाची ओंजळ, परंपरेचा सुगंध आणि कोकणच्या मातीशी घट्ट नाळ जोडलेली भजनकला ही कोकणची सांस्कृतिक शान आहे. या समृद्ध परंपरेचे जतन करताना नव्या पिढीनेही या कलेचा वारसा अभिमानाने पुढे न्यावा, असे आवाहन भाजपा युवा नेते विशाल परब यांनी केले.

भारतीय जनता पार्टी, तुळस व आरसी ग्रुप, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘प्रदेशाध्यक्ष चषक २०२६’ या राज्यस्तरीय भव्य निमंत्रित संगीत भजन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी विशाल परब बोलत होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विशाल परब यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून भजनी कलाकारांना मार्गदर्शन केले.

“भजन ही केवळ करमणुकीची कला नाही; ती आपल्या संस्कृतीची, श्रद्धेची आणि सामाजिक एकात्मतेची वाहक आहे. पारंपरिक भजनी मंडळी आपल्या कलेच्या माध्यमातून हा सांस्कृतिक वारसा जिवंत ठेवत आहेत. हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे,” असे विशाल परब यांनी यावेळी सांगितले.

तुळस येथे रंगलेल्या या भक्तिमय सोहळ्यात भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता ताई कोरगावकर, मंडल अध्यक्ष पप्पू परब, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, संस्था अध्यक्ष विष्णू परब, मोहन मिस्त्री, दीपेश मिस्त्री, सागर सावंत, पोलीस पाटील अनिल परब यांच्यासह सर्व देवस्थान मानकरी उपस्थित होते.

विशाल परब यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भजनी कलाकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

२ व ३ ऑक्टोबर २०२६ रोजी तुळस येथील कर्मयोगी कै. रामचंद्र य. तुळसकर सभागृह, श्री शिवाजी हायस्कूल येथे ही स्पर्धा रंगत आहे.

पाच जिल्ह्यांतील भजनी मंडळांचा सूर एकवटणार!

या राज्यस्तरीय स्पर्धेत मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील निमंत्रित भजन मंडळांचा सहभाग आहे. त्यामुळे विविध भागांतील भजनशैली, गायनपरंपरा आणि संगीत साधनेचा सुरेल मिलाफ तुळसच्या भूमीत अनुभवायला मिळत आहे.

नामांकित कलाकारांची जुगलबंदी, पारंपरिक भजनांचे सादरीकरण आणि स्पर्धक मंडळांची रंगतदार मैफल यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

परंपरेच्या सुरांना नव्या पिढीच्या कर्तृत्वाची साथ!

‘प्रदेशाध्यक्ष चषक २०२६’च्या माध्यमातून भजनकलेला व्यासपीठ, कलाकारांना प्रोत्साहन आणि कोकणच्या सांस्कृतिक वारशाला नवी ऊर्जा देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे ही स्पर्धा केवळ विजेतेपदासाठीची चुरस न राहता कोकणच्या सांस्कृतिक अस्मितेचा उत्सव ठरत आहे.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही विशेष योगदान दिले. यावेळी वैभव होडावडेकर, सुधीर झांट्ये, प्रमोद गोळम, पिंट्या राऊळ, विजय रेडकर, तेजस कुंभार, किशोर सावंत, सुभाष सावंत, राजेश भणगे, रत्नाकर शिरोडकर, बंड्या होडावडेकर, उमेश कुंभार, संतोष सावंत, नंदू बेहेरे, शुभम शेटकर, सिद्धेश शेटकर, नितीन कोचरेकर, पप्पू सावंत, रोहन सावंत, पुरुषोत्तम परब, नाथा परब, भैय्या घोगळे, आनंद माळकर, दत्ताराम माळकर, राजेश तुळसकर, हनू गावडे, घनश्याम गावडे, समीर तांबोसकर आणि दाजी चुडजी यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

भक्ती, संगीत आणि संस्कृतीचा हा सुरेल त्रिवेणी संगम अनुभवण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा तुळस व आरसी ग्रुप, तुळस यांच्या वतीने करण्यात आले आहे.

“कोकणच्या मातीत रुजलेली भजनाची परंपरा अशीच फुलत राहो आणि तिचे सूर पुढील पिढ्यांच्या कानावरही घुमत राहोत,” या भावनेने तुळस येथे ‘प्रदेशाध्यक्ष चषक २०२६’चा भक्तिमय निनाद सुरू झाला आहे.

शेअर करा · Share

सावंतवाडी मधील अधिक बातम्या

अधिक पहा →