सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनराई बंधाऱ्यांची लोकचळवळ बनल्याचे समाधान - पालकमंत्री नितेश राणे

*कोंकण एक्स्प्रेसस
*सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनराई बंधाऱ्यांची लोकचळवळ बनल्याचे समाधान - पालकमंत्री नितेश राणे
*कोकणात पाऊस भरपूर, तरी पाणीटंचाई का? आत्मपरीक्षणाची वेळ
*दक्षिण पाटबंधारे प्रकल्प ओरोस यांचे जल सेवा संकल्प अभियान-पालकमंत्री नितेश राणे
*ओरोस : प्रतिनिधि
सिंधुदुर्गसह कोकणातील जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊन जिल्हे ट्रिगर पॉइंटमध्ये आले आहेत. यासाठी केवळ निसर्गाला दोष देण्यापेक्षा नागरिक म्हणून आपण पाण्याची किती किंमत केली आणि दरवर्षी पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे कितपत नियोजन केले, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती निसर्गनिर्मित आहे की आपण केलेल्या दुर्लक्षातून निर्माण झाली आहे, याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग नगरी येथे केले.
कोकण पाटबंधारे प्रकल्प ठाणे व दक्षिण पाटबंधारे प्रकल्प ओरोस यांच्या वतीने जलसेवा संकल्प अभियान समारोप शुक्रवारी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, उपाध्यक्ष दादा साईल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, व अधीक्षक अभियंता पी एन पाटील या कार्यक्रमात उपस्थित होते. जलसंपदा विभागाच्या शासन निर्णयानुसार व केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार हे अभियान यावेळी राबविण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनराई बंधारे उभारण्याच्या उपक्रमाला गावागावांतून मिळत असलेला प्रतिसाद ही समाधानाची बाब आहे. एखादी मोहीम सुरू करणे वेगळे आणि तिचे लोकचळवळीत रूपांतर होणे वेगळे. आज नागरिक एकत्र येऊन आपल्या गावात आणि शहरात वनराई बंधारे उभारण्यासाठी नैतिक जबाबदारी स्वीकारत पुढाकार घेत आहेत. जिल्ह्याच्या भविष्यासाठी ही सकारात्मक बाब असून, भावी पिढीला पाण्याचे महत्त्व समजावून देणारा हा उपक्रम आहे. कोकणात भरपूर पाऊस पडतो, या समजुतीतून आपण पाण्याचे महत्त्व दुर्लक्षित केले. मात्र, पावसाळ्यातील पाणी अडवून त्याचे योग्य नियोजन केले नाही, तर अशा परिस्थितीचा सामना वारंवार करावा लागू शकतो. त्यामुळे पाण्याचे महत्त्व केवळ संकटाच्या काळात नव्हे, तर वर्षभर लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
शासन, प्रशासन आणि सामाजिक संस्था जलसंधारणासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून पावसाचे पाणी अडवणे, साठवणे आणि त्याचा योग्य विनियोग करणे आवश्यक आहे. नागरिकांनी ही भूमिका प्रामाणिकपणे बजावली, तर भविष्यात सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणावर अशी परिस्थिती ओढवू नये, यासाठी मोठी मदत होईल, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
जाहिरातसिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंगवापरत नसलेला चारा कापणी व वाहतुकीचे नियोजन करण्याचे निर्देश-पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांच्या सूचना
ब्रेकिंगजलजीवन मिशनची रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री आक्रमक!
ब्रेकिंगसिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा स्तुत्य उपक्रम : वनराई बंधाऱ्यांसाठी २५ हजार पिशव्यांचे वितरण
ब्रेकिंग