गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• निवृत्तीवेतनधारकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत हयातीचे दाखले सादर करावेत• युवासेना सिंधुदुर्ग टीमने घेतली जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. मोहन दहिकर साहेब यांची सदिच्छा भेट• मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा• सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्धव्यवसायाचा विस्तार करण्यासाठी जिल्हा बँक सर्वोतोपरी मदत करेल-जिल्हा बँकचे अध्यक्ष मा. श्री. मनीष दळवी यांनी केले• साळिस्तेत दळवी महाविद्यालयाच्या एनएसएस विभातर्फे जलसंवर्धन मोहीम संपन्न• ओबीसी महामंडळाच्या थकबाकीदारांना थकीत व्याजावर 50 टक्के सवलत• कलमठ गावातील जीर्ण विद्युत पोल बदलले• क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेवरील ताबा प्रयत्नाचा सिंधुदुर्गात तीव्र निषेध..• प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 24 वा हप्ता 30 ऑक्टोबर रोजी वितरित होणार• रेकॉड डान्स स्पर्धेत किमया पारकर, दिव्या सावंत प्रथम• निवृत्तीवेतनधारकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत हयातीचे दाखले सादर करावेत• युवासेना सिंधुदुर्ग टीमने घेतली जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. मोहन दहिकर साहेब यांची सदिच्छा भेट• मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा• सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्धव्यवसायाचा विस्तार करण्यासाठी जिल्हा बँक सर्वोतोपरी मदत करेल-जिल्हा बँकचे अध्यक्ष मा. श्री. मनीष दळवी यांनी केले• साळिस्तेत दळवी महाविद्यालयाच्या एनएसएस विभातर्फे जलसंवर्धन मोहीम संपन्न• ओबीसी महामंडळाच्या थकबाकीदारांना थकीत व्याजावर 50 टक्के सवलत• कलमठ गावातील जीर्ण विद्युत पोल बदलले• क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेवरील ताबा प्रयत्नाचा सिंधुदुर्गात तीव्र निषेध..• प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 24 वा हप्ता 30 ऑक्टोबर रोजी वितरित होणार• रेकॉड डान्स स्पर्धेत किमया पारकर, दिव्या सावंत प्रथम

साळिस्तेत दळवी महाविद्यालयाच्या एनएसएस विभातर्फे जलसंवर्धन मोहीम संपन्न

📅 २९ ऑक्टोबर, २०२६👁 ६ब्रेकिंग
साळिस्तेत दळवी महाविद्यालयाच्या एनएसएस विभातर्फे जलसंवर्धन मोहीम संपन्न

**कोंकण एक्सप्रेस

*साळिस्तेत दळवी महाविद्यालयाच्या एनएसएस विभातर्फे जलसंवर्धन मोहीम संपन्न;

*दोन बंधारे बांधून पर्यावरण रक्षणाचा संदेश

*देवगड प्रतिनिधी : संतोष साळसकर

निसर्ग संवर्धनासाठी लोकसहभाग आणि श्रमदानाचा उत्तम वसा घेत, साळिस्ते येथील दळवी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने गावात नुकतीच एक यशस्वी जलसंवर्धन मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी श्रमदान करून दोन बंधारे बांधले असून, या पर्यावरणपूरक उपक्रमाने संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे.

गावातील जलस्त्रोत वाढवणे आणि पाण्याचा प्रत्येक थेंब साठवणे या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. या मोहिमेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक व शेकडो उत्साही विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मोहिमेस साळिस्ते गावचे प्रथम नागरिक (सरपंच) श्री. प्रभाकर तामणकर यांनी विशेष उपस्थिती लावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. तसेच दळवी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक नितीश गुरव, नरेश शेट्ये आणि ओमकार गुरव यांनी विद्यार्थ्यांचे नेतृत्व करत या मोहिमेत मोलाचे मार्गदर्शन व सहभाग नोंदविला.

महाविद्यालयाच्या शेकडो विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने एकत्र येऊन श्रमदान केले व बंधारे बांधण्याचे महत्त्वपूर्ण काम पूर्ण केले. विद्यार्थ्यांच्या या पर्यावरणस्नेही उपक्रमामुळे परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत होणार असून, ग्रामस्थांनीही महाविद्यालयाच्या या सामाजिक बांधिलकीच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

देवगड मधील अधिक बातम्या

अधिक पहा →