‘विकसित भारत युवा संसद २०२६’चे ५ नोव्हेंबर रोजी कुडाळ येथे आयोजन *सिंधुदुर्गनगरी

*कोंकण एक्सप्रेस
*‘विकसित भारत युवा संसद २०२६’चे ५ नोव्हेंबर रोजी कुडाळ येथे आयोजन
*सिंधुदुर्गनगरी
केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने ‘विकसित भारत@२०४७’ या संकल्पनेच्या अनुषंगाने ‘विकसित भारत युवा संसद २०२६’चे आयोजन करण्यात येत आहे. माय भारत (MY Bharat), सिंधुदुर्ग यांच्या पुढाकाराने गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे ही युवा संसद आयोजित करण्यात आली आहे.
राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या नव्या स्वरूपात आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश देशातील युवकांना लोकशाही प्रक्रियेशी जोडणे, त्यांच्यामध्ये संसदीय कार्यपद्धतीविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच राष्ट्राच्या विकास प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग वाढविणे हा आहे. यंदाच्या युवा संसदेचा चर्चेचा मुख्य विषय ‘एक देश, एक निवडणूक’ (One Nation, One Election) असा आहे. या विषयाच्या अनुषंगाने युवकांना आपले विचार, मते आणि दृष्टिकोन संसदीय व्यासपीठावर मांडण्याची संधी मिळणार आहे.
या युवा संसदेत सहभागी होण्यासाठी १८ ते २५ वर्षे वयोगटातील युवक पात्र आहेत. वयाची गणना करण्यासाठी दि. १७ ऑगस्ट २०२६ ही तारीख ग्राह्य धरण्यात येणार आहे. यापूर्वी राष्ट्रीय स्तरावरील युवा संसदेच्या अंतिम फेरीत सहभागी झालेले स्पर्धक या स्पर्धेसाठी पात्र ठरणार नाहीत.
या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पात्र युवकांनी नोंदणीसाठी दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून गुगल फॉर्म भरावा. तसेच अधिक माहितीसाठी माय भारतच्या mybharat.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
जाहिरातसिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
ब्रेकिंग*इयत्ता १० वी व १२ वीच्या फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षांच्या आवेदनपत्रांना मुदतवाढ
ब्रेकिंगआ. प्रसाद लाड, स्वप्निल फाटक यांना समाजाची संस्था कदापी बळकावु देणार नाही
ब्रेकिंगबांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणारे शैक्षणिक थेट आर्थिक लाभ रद्द करून, मूलभूत वस्तू संच देण्याच्या निर्णयाला बांधकाम कामगार महासंघाचा तीव्र विरोध-जिल्हा सचिव हेमंतकुमार परब
ब्रेकिंग