राजवाडी उत्कर्ष मंडळ नाटळ मुंबई संचलित संस्था व माध्यमिक विद्यालय नाटळ यांच्या वतीने नवदुर्गा सन्मान सोहळा संपन्न

*कोंकण एक्सप्रेस
*राजवाडी उत्कर्ष मंडळ नाटळ मुंबई संचलित संस्था व माध्यमिक विद्यालय नाटळ यांच्या वतीने नवदुर्गा सन्मान सोहळा संपन्न
*कणकवली : प्रतिनिधी
गेली चार वर्षे राजवाडी माध्यमिक विद्यालय येथे ,कै.वासंती वसंत सावंत यांच्या स्मरणार्थ त्यांच्या सुनबाई सौ उमा भालचंद्र सावंतयांच्या वतीने नवदुर्गा सन्मान सोहळा आयोजित करण्यात येतो.ह्या वर्षी जिल्हा स्तरीय विविध क्षेत्रातील नऊ महिलांना सन्मानित करण्यात आले.त्यात कणकवली तील समाजसेविका असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना शाल ,श्रीफळ, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यास आले .कार्यक्रम साठी मोठ्या संखेने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. विद्यालयचे चेअरमन श्री नितीन सावंत,संचालक श्री राजू सावंत इतर कमिटी सदस्य उपस्थितीत होते . विद्यालय च्या मुख्याध्यापिका सौ प्रणिता तेली आणि शिक्षक वृंद तसेच सर्व विद्यार्थी ह्यांनी कार्यक्रम उत्तम रीतीने पार पाडण्यासाठी खूप मेहनत घेतली .
जाहिरातकणकवली मधील अधिक बातम्या
अधिक पहा →
स्व-कष्टातून कर्तृत्वाचं शिखर गाठणारी नवदुर्गा सौ शर्मिला केळुसकर मॅडम

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले नवीन कुर्ली येथे दुर्गादेवीचे दर्शन

कणकवली पत्रकार संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या श्रमदानातून वनराई बंधारा

